Pune Police Inspector | आत्मदहन करण्याची ‘गोष्ट’ करणाऱ्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाने कंट्रोल रूमला ‘कॉल’ केल्याने उडाली सर्वांची ‘भंबेरी’; पुणे शहर पोलिसांच्या ‘त्या’ शाखेबाबत उलट सुलट चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector | एका पोलीस निरीक्षकाची मनस्थिती व्यवस्थित नसल्याने ते ‘आत्मदहन’ करण्याची गोष्ट करत असत. आज सकाळी त्यांनी चक्क शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात कॉल केला आणि आत्मदहनाची गोष्ट केली. त्यामुळे अनेकांची भंबेरी उडाली तर या गोष्टीची शहर पोलीस दलात खमंग चर्चा सुरू आहे. (Pune Police Inspector)

शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. कॉल आल्यानंतर कंट्रोल रूमने संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवले. ही गंभीर बाब लक्षात येताच पोलिसांच्या व्हॅन सायरन्सचा आवाज करीत ‘त्या’ निरीक्षकाच्या घरी पोहचल्या. सकाळची साडेआठ वाजण्याची वेळ असल्याने तेव्हा हे निरीक्षक घरीच होते. या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी वाहतूक शाखेतील त्या निरीक्षकाची विचारपूस केली. त्यांची मनस्थिती जाणून घेऊन त्यांना सबुरीचे चार शब्द सांगितले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या मनात आलेला विचार बदलल्याचे सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून या निरीक्षकाच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Pune Police Inspector)

या प्रकरणाची चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, वाहतूक शाखेतील एका पोलीस निरीक्षकाची गेल्या महिन्याभरात तीन ठिकाणी अंतर्गत बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली. त्यांनी आत्मदहनाची गोष्ट केली आणि कंट्रोलने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षक यांना कळवले. त्यांनी तातडीने या निरीक्षकाच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगितले.

या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानी दुजोरा दिला असून संबंधित पोलीस निरीक्षकांचे समुपदेशन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title :- Pune Police Inspector | pune police inspector call to control room and talk about suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 3,198 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Parenting | मुलांच्या समोर पालकांनी चुकूनही करू नयेत ‘ही’ 5 कामे, त्यांचे आयुष्य होईल ‘खराब’, जाणून घ्या

Pune Court | ‘या’ प्रकरणात नानासाहेब गायकवाडांसह 6 जणांचा जामीन फेटाळला; जाणून घ्या कारण आणि प्रकरण