Pune Police Inspcector Suspended | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक निलंबीत, जाणून घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspcector Suspended | कर्तव्यात कसूर केल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी (Senior Police Officers) बदलीकेल्यानंतर त्याविरूध्द महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) Maharashtra Administrative Tribunal (MAT) Mumbai दाद मागण्यासाठी गेलेल्या पोलिस निरीक्षकास चांगलाच फटका बसला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी बदली केलेल्या ठिकाणी हजर न होता, थेट मॅट कोर्टामध्ये अर्ज करून शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी (In Case Of Breach Of Discipline) मॅट कोर्टानेच संबंधित पोलिस निरीक्षकावर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मॅट कोर्टाचे आदेश प्राप्त होताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम (Police Inspector Ravindra Kadam) यांना निलंबीत केले आहे. (Pune Police Inspcector Suspended)

निलंबनाची कारवाई झालेले पोलिस निरीक्षक रवींद्र कदम (PI Ravindra Kadam) हे यापुर्वी चंदननगर पोलिस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) कर्तव्यास होते. त्यांनी कर्तव्यात कसुरी केल्यामुळे त्यांची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी चंदनगर पोलिस (Chandan Nagar Police) ठाण्यातून दंगा काबू पथकामध्ये बदली केली होती. त्यानंतर कदम हे दंगा काबू पथक येथे हजर होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी बदलीविरूध्द तात्काळ मॅट कोर्टात धाव घेतली. निरीक्षक कदम यांनी बदलीविरूध्द मॅटकोर्टात दाखल केलेलाच अर्ज कोर्टाने रद्द केला आणि त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत ताशेरे ओढले. (Pune Police Inspcector Suspended)

मॅटने (MAT Court) निरीक्षक कदम यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनास दिले होते. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांना शुक्रवारी निलंबीत (PI Ravindra Kadam Suspended) केले आहे.

Web Title :-  Pune Police Inspector Suspended | Pune city police inspector suspended, know why

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली जादा मतं कोणाची?, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

T20 World Cup 2022 | दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Ind vs Zim | मेलबर्नमधील सामन्यात रोहित शर्मा करणार टीममध्ये बदल? ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता