Pune Police Inspector Transfer | ‘फरासखाना’चे वरिष्ठ पो. निरीक्षक शब्बीर सय्यद यांची बदली तर कोंढव्यात पो. निरीक्षक संदीप भोसले यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. फरासखाना स्टेशनचे पोलिस वरिष्ठ निरीक्षक व गुन्हे शाखा युनिट-1 येथील बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. (Pune Police Inspector Transfer)

 

वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

शब्बीर सय्यद यांची गुन्हे शाखेच्या युनिट-1 पदी बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखा युनिट-1 पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची कोंढवा पोलिस ठाण्यात (गुन्हे) निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक – नियुक्तीचे ठिकाण

1. दादासाहेब सोमनाथ चुडाप्पा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन

2. शब्बीर सत्तार सय्यद – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-1

3. संदीप पांडूरंग भोसले – निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे

 

Web Title :  Internal Transfer Of Three Police Inspector In Pune City Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा