Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 5 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; चतुःश्रृंगी, डेक्कन आणि कोथरूड पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकांच्या नियुक्त्या

0
346
Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 5 Police Inspectors in Pune City Police Force; Appointments of Senior Inspectors in Chatushringi, Deccan and Kothrud Police Stations
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहर पोलिस दलातील 5 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत (Pune City Police). प्रशासकीय कारणास्तव पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर प्रभारी अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) आर. राजा यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामध्ये चतुःश्रृंगी, डेक्कन आणि कोथरूड पोलिस ठाण्यात नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत. (Pune Police Inspector Transfer)

 

पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे  –

1. बालाजी अंगदराव पांढरे (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी पो.स्टे.)
2. महेंद्र जयवंतराव जगताप (वरिष्ठ निरीक्षक कोथरूड ते विशेष शाखा)
3. संदीपान वसंतराव पवार (विशेष शाखा-पोलिस आयुक्त यांचे वाचक ते वरिष्ठ निरीक्षक डेक्कन पो.स्टे.)
4. हेमंत चंद्रकांत पाटील (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोथरूड पो.स्टे.)
5. बाळासाहेब सदाशिव बडे (पोलिस निरीक्षक (गुन्हे), कोथरूड पो.स्टे. ते वाहतूक शाखा)

* वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार दत्तात्रय वाघचवरे यांना पुढील आदेश होईपर्यंत नियंत्रण कक्ष येथे कर्तव्यार्थ नेमण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Internal transfers of 5 Police Inspectors in Pune City Police Force; Appointments of Senior Inspectors in Chatushringi, Deccan and Kothrud Police Stations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याची ओळख पटली

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले… (व्हिडिओ)