ब्रेकिंग : पोलीसनामा इम्पॅक्ट – पुण्यातील ‘त्या’ प्रकरणात वरिष्ठांची ‘कडक’ कारवाई, 2 पोलिसांनंतर आज सहाय्यक निरीक्षक ‘तडकाफडकी’ निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपारीची कारवाई झालेला गुंड अन् खडक पोलिसांच्या डीबी पथकाने एका निष्पाप तरूणाला शिवागीळ, मारहाण तसेच 24 तास लॉकअपमध्ये ठेवून पैसे घेऊन सोडल्या प्रकरणात अखेर डीबी इन्चार्जचे पोलीस खात्यातून ‘तडकाफडकी’ निलंबन करण्यात आले आहे. उमाजी राठोड असे निलंबन करण्यात आलेल्या सहाय्यक निरीक्षकाचे नाव आहे. यापुर्वी कर्मचारी संदीप कांबळे आणि राहूल धोत्रे या दोन कर्मचार्‍यांचे निलबंन करण्यात आले होते.

घोरपडी पेठ परिसरातील 22 वर्षीय तरुणाने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यात फोटो, रेकॉर्डींग जोडण्यात आले होते. संबंधित तरूण दुपारी माशे आळीत थांबला होता. त्यावेळी गुंड महिंद्र उर्फ वॉस्को कांबळे तेथे आला. दोघांमध्ये खून्नसने पाहिल्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी तो गुंड पोलिसांना घेऊन येतो असे म्हणून गेला. त्यानंतर डीबी पथकातील कर्मचार्‍यांना घेऊन आला.

कर्मचार्‍यांनी काही एक न विचारताच त्याच्या कानशीलात मारली आणि पोलीस चौकीत नेले. तेथून पोलीस ठाण्यात नेहून सहाय्यक निरीक्षक उमाजी राठोड यांच्यासमोर उभे केले. त्यानंतर त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. तसेच, त्याच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिल्यानंतर त्याची सुटका केल्याचे त्याने पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले होते.

यानंतर चौकशी करून तत्काळ दोन कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. परंतु, डीबी इन्चार्ज सहाय्यक निरीक्षकांवर काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, सोमवारी रात्री तडकाफडकी सहाय्यक निरीक्षकाचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. निलंबनाचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत.