Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : Pune Police | चारित्र्य पडताळणीमध्ये उशीर झाल्याने सुरेश पिंगळे (Suresh Pingle) या नागरिकाने स्वत: च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे (DCP Mitesh Ghatte) यांनी खडकी पोलीस ठाण्यातील (Khadki Police Station, Pune) चारित्र्य पडताळणीचे काम करीत असलेल्या महिला कर्मचार्‍यांना जबाबदार धरून निलंबित केले आहे. त्याचवेळी शुक्रवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सुरेश पिंगळे हे गेल्या ६ महिन्यांपासून कौटुंबिक समस्येमुळे तणावाखाली असल्याचा आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई विद्या पोखरकर (Vidya Pokharkar) यांना निलंबित करण्यात आले आहे. पोरखकर या खडकी पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. 1 ते 22 जुलै 2021 या कालावधीमध्ये चारित्र्य पडताळणी कर्तव्यार्थ असताना सुरेश पिंगळे यांचे चारित्र्य पडताळणी प्रकरणी चारित्र्य पडताळणी न करुन देता त्यांना खडकी पोलीस स्टेशन येथे चकरा मारायला लावलेल्या आहेत. तसेच त्यांचेवर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांचेवर गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्यांचे चारित्र्य पडताळणीचे व्हेरीफिकेशन करुन दिलेले नाही. त्या अनुषंगाने 1 जुलै रोजी त्यांचे चारित्र्य पडताळणीचा अर्ज  ऑनलाईन सादर केला होता.

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 6,384 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

त्यानंतर हा अर्ज 22 जुलै रोजी पुढील कार्यवाहीसाठी पोलीस आयुक्त कार्यालय विशेष शाखा येथे पाठविला आहे. त्या दरम्यान त्यांनी सुरेश पिंगळे यांना तुमचे व्हेरीफिकेशन होणार नाही, तुमचा पत्ता चुकीचा आहे. तुम्ही पत्ता बदलून आणा, असे सांगून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचे व्हेरीफिकेशन न झाल्याने   कंपनीने  त्यांना कामास येण्यास बंदी केली. त्यांनी 18 ऑगस्ट 2021 रोजी स्वत:चे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याला महिला पोलीस कर्मचारी यांचे कर्तव्यार्थ बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा करुन कसुरी केलेली आहे. पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन व बेजाबादारपणाचे असल्याने त्यांना निलंबत करण्यात आले आहे.

महिला पोलीस कर्मचार्‍याला निलंबित करताना सुरेश पिंगळे यांच्यावर कोणताही गुन्हा नसताना
त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे सांगून त्यांचे चारित्र्य पडताळणीचे व्हेरीफिकेशन करुन दिलेले
नाही. तसेच त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यांना कंपनीने कामावर येण्यास बंदी केली, अशी
कारणामुळे मनस्ताप होऊन त्यांनी आत्महत्या केली असे म्हटले आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही – अजित पवार

Pimpri Chinchwad Corporation | महापालिकेची महासभा सत्ताधारी भाजपाने रेटली, 10 मिनिटांत 22 विषय मंजूर करत गुंडाळले कामकाज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Police | lady police vidya pokharkar of khadki police station suspended in suresh pingle death case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update