Pune Police | यंदाचा पालखी सोहळा अनुभवता येणार ‘एका क्लीकवर’, पुणे पोलिसांकडून नागरिकांसाठी खास सोय

लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा पालखी (Palkhi) आणि वारी सोहळा (Wari Ceremony) खास असणार आहे. राज्यभरातून लाखो वारकरी देहू (Dehu) आणि आळंदी (Alandi) येथे वारीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. सोमवारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Jagadguru Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) म्हणजे माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (दि.21 जून) रोजी होणार आहे. या दोन्ही पालख्या 22 जून रोजी पुण्यात मुक्कामी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस (Pune Police) सुरक्षेच्या बाबतीत जोरात तयारी केली आहे. पालखी सहळा उत्साहात पार पडावा यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

 

पुणे पोलिसांकडून (Pune Police) लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती वाहन चालकांसाठी मिळावी यासाठी diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळणार आहे. मोबाईलवर एका क्लिकवर पालखीचे सर्व अपडेट नागरिकांना मिळणार आहेत, अशी माहिती पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिली.

 

अमिताभ गुप्ता म्हणाले, पुण्यात एक पालखी दोन दिवस, तर दुसरी तीन दिवस असणार आहे. शहरात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्कामाची तयारी पोलिसांनी केली आहे. खुले असलेले रस्ते, बंद रस्ते, पालखीचा मुक्काम या सगळ्यांसह वाहतुकी बद्दल सगळे अपडेट मिळणार आहेत.

चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पहिल्यांदाच ड्रोनद्वारे पोलीस पाहणी करणार आहेत. शहरात एकूण चार हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे.
यामध्ये दोन अपर पोलीस आयुक्त (Addl CP), 9 पोलीस उपायुक्त (DCP), 19 सहायक पोलीस आयुक्त (ACP),
103 पोलीस निरीक्षक (PI), 307 सहायक पोलीस निरीक्षक (API), पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI),
पोलीस अंमलदार, वाहतुक पोलीस (Traffic Police) असा फौजफाटा रस्त्यावर असणार आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.

 

Web Title :- Pune Police | live palkhi tracking facility will be available from pune police commissioner of police amitabh gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

 

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

 

Jio Cheapest Validity Plan 2022 | 336 दिवसांपर्यंत अनलिमिटिड कॉलिंग, 24जीबी डाटासोबत Jio च्या या प्लानची जाणून घ्या किंमत!

 

Anti Corruption Bureau (ACB) Satara | वीज जोडणीसाठी 12 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चा कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात