पुणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अनिल शिंदे (वय 57) असे निधन झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.

अनिल शिंदे हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यांना दत्तनगर पोलीस चौकीला काम करत होते. काल ते रात्रीपाळीवर ड्युटीला होते. यावेळी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ही माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अनिल शिंदे हे मनमिळाऊ व कामात तरबेज म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे. ते खडक पोलीस लाईनीत राहण्यास होते.

You might also like