पुणे : गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखेत काम करताना गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच महत्वाच्या वेळी बंदोबस्ताचे कामही करावे लागते. पण, लोकसभा निवडणुक व मतमोजणी तसेच अतिमहत्वाचे बंदोबस्ताकरीता नेमूणक केली असतानाही बंदोबस्तासाठी गैरहजर राहणाऱ्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. गणेश दिलीप बाजारे असे त्याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, गणेश बाजारे हे गुन्हे शाखेमध्ये नेमणूकीला होते. ते २९ नोव्हेंबर २०१८ पासून गैरहजार आहेत. लोकसभा निवडणुक, मतमोजणी, या अतिमहत्वाचे बंदोबस्ताकरीता त्यांना कामावर हजर राहण्याचे समज पत्र ४ एप्रिल २०१९ रोजी सहायक पोलीस आयुक्तांनी दिले होते. तरीही ते बंदोबस्ताकरीता हजर झाले नाहीत. गणशोत्सव बंदोबस्ताकरीता त्यांना कामावर हजर राहण्याची समज पत्र दिले होते. तसेच तुमची अडचणी समक्ष येऊन सांगण्यास सांगितले होते.

तरीही ते गणेशोत्सव दरम्यान कर्तव्यावर हजर झाले नाही. २९ नोंव्हेंबर २०१८ पासून ते आजारी असल्याच्या कारणावरुन रजेवर आहेत. मात्र, त्याबाबत कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे त्यांनी सादर केलेली नाहीत. तसेच कामावर हजर राहिले नाहीत. त्यामुळे हे कृत्य बेजबाबदारपणे व उद्धटपणाचे व पोलीस दलाचे शिस्तीस बाधा आणणारे व अशोभनीय वर्तन केले आहे.

तुमच्या अशा गैरवर्तनामुळे पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्यास कारणीभूत झाल्याने गणेश बाजारे यांना पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी त्यांना निलंबित केले आहे.

Visit : policenama.com