Pune Police MCOCA Action | कोंढवा-उंड्री परिसरातील ओंकार कापरेसह 10 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 62 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन (Kidnapping Case) त्याचा खून (Murder Case) करणाऱ्या ओंकार चंद्रशेखर कापरे (Omkar Chandrashekhar Kapre) याच्यासह इतर 10 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 62 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

अल्पवयीन मुलगा कोंढवा खु. मनपा शाळेमागे ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेला होता. मात्र, तो उशीरापर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कोंढवा पोलिसांनी आयपीसी 363 नुसार गुन्हा दाखल करुन मुलाचा शोध सुरु केला. त्यावेळी बेपत्ता मुलाचा मृतदेह सासवड परिसरात आढळून आला होता. (Pune Police MCOCA Action)

याप्रकरणी टोळी प्रमुख ओंकार चंद्रशेखर कापरे (वय-27 रा. कोंढवा खुर्द, पुणे), साईराज राणाप्रताप लोणकर Sairaj Ranapratap Lonkar (वय-23 रा. होले वस्ती चौक, उंड्री), प्रणय सुनिल पवार Pranay Sunil Pawar (वय-19 रा. कोंढवा), सौरभ उर्फ दत्ता माणिक तायडे Saurabh Alias Dutta Manik Tayade (वय-18 रा. मारुती आळी, बाबर चौक, कोंढवा खु.), कृष्णा प्रकाश जोगदंडे Krishna Prakash Jogdande (वय-20 रा. कमलदिप पार्क, कोंढवा खु.), महादेव उर्फ पप्पु गोविंद गजाकोष Mahadev Alias Pappu Govind Gajakosh (वय-19 रा. शिवनेरीनगर लेन नं.6, कोंढवा खु.), रोहन अनिल गवळी Rohan Anil Gavli (वय-21 रा. कोंढवा खु.) यांना अटक करुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर राज ठोंबरे Raj Thombre (रा. शिवनेरीनगर, कोंढवा खु.), अमन (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

निल खवळे याला आमची टीप देतो या कारणावरुन आरोपींनी अल्पवयीन मुलाचे कोंढवा येथून चारचाकी गाडीतून अपहरण केले. मंतरवाडीच्या आसपास अपहरण केलेल्या मुलाला झाडाच्या फांद्यांनी मारहाण केली. त्यानंतर सासवड येथील दिवे घाटाजवळील टेकडी जवळच्या खोली नेऊन त्याला फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. याबाबत आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) 302, 364, 120(ब), 201, 326, 143, 147, 148, 149, 504, 506, महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कलम वाढ केली.

आरोपी टोळी प्रमुख ओंकार कापरे याने गुन्हेगारांची संघटित टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी संघटित व वैयक्तीक खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, शस्त्राने जखमी करणे, शस्त्र बाळगणे, दंगा, मालमत्तेचे नुकसान, पोलीस आदेशाचा भंग, नागरिकांना मारहाण करुन जखमी करणे, शिवीगाळ करुन हत्यारांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, चोरी यासारखे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadai Police Station) हद्दीत केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) यांनी परिमंडळ-5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले (PI Sandeep Bhosale), पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले (PI Sanjay Mogale) ,
पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले (PSI Samadhan Machale), पोलीस अंमलदार जगदीश पाटील,
राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर, गणेश आगम, शिवलाल शिंदे यांनी केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व
मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का,
तडीपार यासारख्या कारवाया केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 62 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav – Traffic Changes | गणपतीच्या आगमनानिमत्त पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग