Pune Police MCOCA Action | वडगाव शेरी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अनुज यादव टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 110 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणांना मारहाण करत एकावर कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या वडगाव शेरी परिसरातील सराईत गुन्हेगार अनुज यादव व त्याच्या इतर 6 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 110 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

याबाबत सौरभ संतोष पाडळे (वय-22 रा. पाडळे निवास, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनुज जितेंद्र यादव, हरिकेश टुणटुण चव्हाण (वय-18), आकाश भरत पवार (वय-23), अमोल वसंत चोरघडे (वय-30), अक्षत निश्चल तापकिर (वय-20) यांच्यावर आयपीसी 307, 326, 324, 143, 144, 147, 148, 149 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर राहुल विनोद बारवसा (वय-23) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा प्रकार वडगाव शेरी (Vadgaon Sherry) येथील दिगंबरनगर येथे 24 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला आहे.

फिर्यादी सौरभ पाडळे याचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाश पवार याच्यासोबत वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी सोरभ दिगंबरनगर येथे गेला होता. त्यावेळी आकाश पवार याने सौरभ याच्या कानाखाली मारली. तर अनुज यादव याने त्याच्याकडे असलेल्या धारदार कोयत्याने ऋषिकेश याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तर इतर आरोपींनी शिवागाळ करुन ‘याना कोणालाच सोडू नका’ असे म्हणून रस्त्यावर पडलेले दगड व विटांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी लोकांकडे हातातील कोयते दाखवून ते हवेत फिरवून कोण मध्ये आला तर सोडणार नाही, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.

चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग
रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे (सह पोलीस आयुक्त अतिरिक्त कार्यभार)
रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त
संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior PI Rajendra Landge),
पोलीस निरीक्षक गुन्हे मनिषा पाटील (PI Manisha Patil), पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे,
संजय गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे,
अनुप सांगळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा, पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त