Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील हेमंत उर्फ विकी काळे टोळीवर ‘मोक्का’! पुणे पोलिसांची चालु वर्षातील 17 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | भांडण सोडवल्याचा राग मनात धरून सराईत गुन्हेगारांनी तिघांवर हल्ला करुन परिसरात दहशत माजवणाऱ्या रामवाडी येथील हेमंत उर्फ विकी धर्मा काळे व व त्याच्या इतर 9 साथीदारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पुणे पोलिसांची चालु वर्षातील ही 17 वी मोक्का कारवाई आहे. हा प्रकार 23 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वारजे भागातील अचानक चौकात घडला होता.

याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 324, 323, 506, 143, 144, 147, 148, 149, 427, सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख हेमंत उर्फ विकी धर्मा काळे (वय-26 रा. रामनगर, वारजे), धनंजय उर्फ धनाजी नागनाथ सुर्यवंशी (वय-29 रा. गणेशपुरी सोसायटी, रामनगर), युवराज धर्मा काळे (वय-24), आक्षश उर्फ अवधूत महेश यादव (वय-29), कुंदन उर्फ सोन्या शिवाजी गायकवाड (वय-26), संजय उर्फ बाबू विकास चव्हाण (वय-20 सर्व रा. शिवाजी चौक, रामनगर) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारासह एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.(Pune Police MCOCA Action)

आरोपी हेमंत उर्फ विकी काळे याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, अपहरण, जबरी चोरी, पोलिसांच्या आदेशाचा भंग, दहशत पसरवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम
3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील
यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा
अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे,
पोलीस अंमलदार अतुल भिंगारदिवे, रामदास गोणते, गोविंद फड, किरण तळेकर, विजय खिलारी व नितीन कातुर्डे
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Swargate Crime | बनावट कागदपत्रे देऊन कारची विक्री, फसवणूक करणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांकडून अटक

Pune Kondhwa Crime | पुणे : कामगार महिलेसोबत गैरवर्तन, जाब विचारल्याच्या कारणावरुन मारहाण

Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून रॉड व दगडाने मारहाण, दोघांना अटक