Pune Police MCOCA Action | हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरज उर्फ चुस मोहिते टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 109 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | तक्रार दिल्याच्या रागातून 15 जणांच्या टोळक्याने वैदुवाडी येथे फिर्यादी यांच्या घरावर हल्ला करून परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड केली. तसेच हातातील शस्त्राने वार करुन परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुरज उर्फ चुस बाळु मोहिते व त्याच्या इतर 15 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 109 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

याप्रकरणी टोळी प्रमुख सुरज उर्फ चुस बाळु मोहिते (वय-21 रा. वैदवाडी, हडपसर), अनिकेत रविंद्र पाटोळे (वय-23), आदीत्य रविंद्र पाटोळे (वय-20), नवनाथ उर्फ लखन बाळू मोहिते (वय-19), तुषार बाळू मोहिते (वय-18), हसनेल अली शेनागो (वय-19), गौरव विजय झाटे (वय-19), पंकज विठ्ठल कांबळे (वय-21), ओमकार महादेव देढे (वय-19), रविंद्र बाबुराव पाटोळे (वय-46), सचिन मारुती खंडाळे (वय -25 सर्व रा. वैदुवाडी, रामटेकडी हडपसर) यांच्या सह पाच अल्पवयीन मुलांवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयपीसी 307, 324, 427, 143, 144, 145, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News) पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर टोळी प्रमुख सुरज मोहिते व सचिन खंडाळे हे फरार आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके
(Sr PI Ravindra Shelke) यांनी परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्या मार्फत
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे (Hadapsar Division) सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे
रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस रवींद्र शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivle),
सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप (API Sarika Jagtap), पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, निगराणी
पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, हनुमंत झगडे, गिरीश एकोर्गे,
बाबासाहेब शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, फरार सराईत गुन्हेगाराला कोयत्यासह सहकारनगर पोलिसांकडून अटक

अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हातवारे, आरोपीला अटक; धनकवडी परिसरातील प्रकार

शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा, औंध मधील प्रकार

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करुन खून; वारजे पोलिसांकडून पतीला 5 तासात अटक