Pune Police MCOCA Action | दहशत पसरवणाऱ्या तौफीक भोलावाले व त्याच्या इतर 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 43 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | चहाच्या टपरीवर झालेल्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करणाऱ्या तौफीक रियाज भोलावाले व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 43 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

फिर्यादी हे 9 जुलै रोजी कमला नेहरू चौकातील (Kamala Nehru Chowk) एका पान शॉपजवळ मित्रांसोबत गप्पा मारत होते. फिर्यादी यांच्या ओळखीचे असलेले तेजस होनमाने व अजिम सय्यद यांची 15 ऑगस्ट चौकातील एका चहाच्या टपरीवर भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन तौफीक भोलावाले व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना लोखंडी रॉड, हॉकी स्टीक व लाकडी बांबुने बेदम माराहण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 307, 324, 143, 144, 147, 148, 149, 323, 506, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Police MCOCA Action)

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात टोळी प्रमुख तौफीक रियाज भोलावाले (वय-22 रा. कसबा पेठ, पुणे), ऋतिक राजेश गायकवाड (वय-22), उजेर शाहिद शेख (वय-21), अरमान इकबाल शेख (वय-20), रफिक जाफर शेख (वय-35 सर्व रा. रियाज हाईट्स, नविन मंगळवार पेठ,पुणे) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

तपासादरम्यान तौफीक भोलावाले याने टोळी तयार करुन मागील सहा वर्षात गुन्हे केले आहेत. त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1) (ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (PI Mangesh Jagtap)
यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil)
यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी
मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास फरासखाना विभागाचे (Faraskhana Division) सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल,
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा (Senior PI Dadasaheb Chudappa),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, सर्व्हेलन्स पथकाकडील
सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे (API Santosh Shinde),
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi), पोलीस अंमलदार अजीत शिंदे,
तुषार खडके, पंकज देशमुख, शशीकांत ननावरे, पुंडलीक झुंबड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)