Pune Police MCOCA Action | पेट्रोल पंपावरील रोकड लुटणाऱ्या आदर्श चौधरी टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 97 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | लोखंडी हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 28 हजार 870 रुपयांची रोकड लुटणाऱ्या आदर्श अनिल चौधरी व त्याच्या इतर 4 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 97 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

आदर्श अनिल चौधरी (वय-21 रा. लोणावळा वर्सोली, पुणे), आशुतोष संतोष साठे (वय-22 रा. मु.पो. वाळेण कोळवण ता. मुळशी), आकाश हरेंद्र शर्मा (वय-19 रा. काळुराम खांदवेनगर, लोहगाव), राहुल नानाभाऊ तायडे (वय-20 रा. वाकसे, लोणावळा), यांना अटक केली आहे. तर संजय मारुती चव्हाण (वय-22 रा.स्वराज्यनगर, वलवण, ता. मावळ याच्यावर 392, 427, 452, 34 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arms Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत 11 नोव्हेंबर रोजी घडला होता.

टोळी प्रमुख आदर्श चौधरी याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम
3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव विमानतळ पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे (Sr PI Anandrao Khobare) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-4
शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त
गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी (PI Sangita Mali),
सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan), ढावरे, सर्व्हेलन्स पथकातील
पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोळ्ळुरे, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, शिंदे, भोर, मांजरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर