Pune Police MCOCA Action | हडपसरमधील आदनान शेख टोळीच्या 10 जणांवर ‘मोक्का’, सीपी रितेश कुमार यांच्याकडून आत्तापर्यंत 59 संघटित गुन्हेगारी टोळयांवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी हडपसर परिसरातील आदनान आबीद शेख याच्यासह त्याच्या टोळीतील 10 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल आहे. आदनान शेख आणि त्याच्या साथीदारांनी दि. 17 ऑगस्ट रोजी गुलाम अलीनगर परिसरात एकाचा खून करून परिसरात दहशत निर्माण केली होती. (Pune Police MCOCA Action)

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांपैकी टोळी प्रमुख आदनान आबीद शेख Adnan Abid Shaikh (25, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), सादीक अब्दुल करीम शेख (56, रा. गुलाम अलीनगर, हडपसर), अनिस सादिक शेख (32), शाकीर कादर सैय्यद (30), मोहसीन जावेद शेख (24) आणि शेहाबाज कादीर शेख (28) यांना अटक करण्यात आलेली आहे. तर जाकीर कादर सैय्यद (45), अमीर अकिल सैय्यद (20), सिकंदर आयुब शेख (35), आणि अकबर अफजल हुसेन शेख (43, सर्व रा. हडपसर) हे पोलिसांना वॉन्टेड आहेत. (Pune Police MCOCA Action)

टोळीचा म्होरक्या आदनान याने संघटित टोळी तयार करून परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी तसेच इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा करून गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी टोळीवर मोक्का कारवाई करण्यात यावी म्हणून पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आदनान शेख टोळीतील 10 जणांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Ritesh Kumar),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Patare ),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनय पाटणकर (PI Vinay Patankar), पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane),
पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार, पोलिस अंमलदार अमोल घावटे,
उत्तेश्वर धस, पुनम राणे, हनुमंत कांबळे आणि दिनेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत तब्बल 59 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील संघटित गुन्हेगारी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलेले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोपर्डी अत्याचार प्रकरणातील कैदी जितेंद्र शिंदे याची येरवडा कारागृहात आत्महत्या