
Pune Police MCOCA Action | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमन पठाण व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 49 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून धारदार हत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करणाऱ्या अमन युसुफ पठाण उर्फ खान व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 49 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)
टोळी प्रमुख अमन युसुफ पठाण उर्फ खान (वय-23 रा. नाना पेठ, पुणे), आवेज अश्पाक शेख (वय-22 रा. गणेश पेठ, पुणे), स्वप्नील प्रशांत शिंदे (वय-19 रा, संभाजीनगर चाळ, धनकवडी, पुणे) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) आयपीसी 307, 324, 504, 506, 34, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात आरोपींना अटक केली आहे. (Pune Police MCOCA Action)
आरोपी अमन पठाण उर्फ खान याने इतर साथीदारांना सोबत घेऊन संघटीत टोळी तयार केली. आरोपींनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी खुनाचा प्रयत्न, हत्यार जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.
समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे (Senior PI Suresh Shinde) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास फरासखाना विभागाचे (Faraskhana Division) सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) करीत आहेत.
पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 49 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल,
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare), पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे
(PSI Sunil Ranadive), पोलीस अंमलदार संतोष थोरात, किरण शितोळे यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा