Pune Police MCOCA Action | पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात दहशत माजविणाऱ्या राहुल शेंडगे व त्याच्या इतर 10 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 54 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | भावाला मारहाण केल्याच्या कारणावरुन दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन टिंबर मार्केट (Timber Market) परिसरात दहशत पसरवणाऱ्या राहुल शेंडगे व त्याच्या 10 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 54 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

फिर्यादी व त्यांचा मित्र टिंबर मार्केट येथील एका ऑफिसजवळ गप्पा मारत उभे असताना चार दुचाकीवरुन येऊन टोळी प्रमुख राहुल शेडगे व त्याच्या इतर 9 साथीदारांनी भावाला मारहाण का केली अशी विचारणा केली. राहुल शेंडगे व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी व मित्राला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने वार केले. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवला. याबाबत खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) आयपीसी 307,323,504,143,147,148,149 आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट रोजी घडला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी राहुल दत्तु शेंडगे (वय-21), करण ऊर्फ ठोंब्या भानुदास आगलावे (वय-21), लखन भानुदास आगलावे (वय-22), शंकर आण्णा कोंगाडी (वय-25), रोहन दत्तु शेंडगे (वय-24 सर्व रा. सी.पी. लोहीयानगर, पुणे), महेश इंद्रजित आगलावे (वय-24 रा. मार्केट यार्ड, पुणे), विशाल उर्फ लाल्या उर्फ लक्ष्मण भारत पारधे (वय-21 रा. गंजपेठ, पुणे) यांना अटक केली आहे. तर एक अल्पवयीन मुलगा व तीन आरोपी फरार आहेत.

टोळी प्रमुख राहुल शेंडगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन जबरी चोरी, दरोडा (Robbery), धमकी, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने (Senior PI Sunil Mane) यांनी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal) करीत आहेत.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 54 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीपसिंह गिल,
सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने,
पोलीस निरिक्षक गुन्हे संपतराव राऊत (PI Sampatrao Raut),
सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे (PSI Akash Vite),
अतुल बनकर (PSI Atul Bankar), पोलीस अंमलदार महेश पवार,
नितीन जाधव स्वप्नील बांदल यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | … तर राजकारणात सक्रिय व्हायला तयार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचे राजकारणात येण्याचे संकेत

NCP | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाकडून नियुक्ती