Pune Police MPDA Action | हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडावर एमपीडीए कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

पुणे : Pune Police MPDA Action | हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडावर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्याखाली कारवाई केली असून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) स्थानबद्ध केले आहे. (Pune Police MPDA Action)

गौरव संतोष अडसुळ Gaurav Santosh Adsul (वय २०, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी, ता. हवेली) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Pune Police MPDA Action)

गौरव हा त्याच्या साथीदारांसह हडपर परिसरात लोखंडी कोयत्यासह जबरी चोरी, दुखापत, बेकायदा हत्यार बाळगणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. शेवाळीवाडी येथील मिठाईच्या दुकानात साथीदारांसह शिरुन तोडफोड केली होती. त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गेल्या ५ वर्षात ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे.

त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याचे (Hadapsar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) आणि पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre) यांनी गौरव अडसुळ याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी त्याला मंजुरी देत अडसुळ याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ६७ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पोलीस ठाण्यातच पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण, महिला पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून धमकावणी

धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करणाऱ्या अमर जमादार व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 95 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

कामगार नेते यशवंत भोसलेंना 16 लाखांचा गंडा, राष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या खजिनदाराला अटक

सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त