Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 44 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakarnagar Police Station) हद्दीत गंभीर गुन्हे करुन परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार हर्षद देशमुख (Harshad Rajendra Deshmukh) याच्याविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 44 वी कारवाई आहे.

हर्षद राजेंद्र देशमुख (वय-27 रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार (Criminal) असून त्याने साथीदारांसह सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, लोखंडी रॉड यासारख्या हत्यारांसह खंडणी, जबरी चोरी, दुखापत, अपहरण, दिवसा व रात्री घरफोडी, चोरी, जाळपोळ, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

हर्षद राजेंद्र देशमुख याच्या विरोधात मागील पाच वर्षात 4 गुन्हे दाखल आहेत.
आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी हर्षद देशमुख याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. ही कामगिरी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Senior PI Surendra Malale) व पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Senior PI A.T. Khobare) यांनी केली.

पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 44 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action)
स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे
सांगण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | हॉटेल व्यवसायिकाला महारहाण करुन खंडणी मागणाऱ्या अखिल उर्फ ब्रिटिश पालांडे टोळीवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 63 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA