Pune Police MPDA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 45 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MPDA Action | बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे (Pune Crime News) करुन परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) सनी संतोष भरगुडे (Sunny Santosh Bhargude) याच्याविरुद्ध पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 45 वी कारवाई आहे.

सनी संतोष भरगुडे (वय-24 रा. निलेश कॉम्प्लेक्स, बिबवेवाडी, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत चाकू, कोयता (Koyata) यासारख्या हत्यारांसह फिरताना गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर सरकारी कर्मचाऱ्यास दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनयभंग Molestation (पोक्सो), दरोड्याचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Police MPDA Action)

सनी भरगुडे याच्या विरोधात मागील पाच वर्षात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता.
प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी सनी भरगुडे याला
अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे (Senior PI Savita Dhamdhere)
व पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे (Senior PI A. T. Khobare) यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील ससून हॉस्पीटलच्या गेटवर अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त; कोटयावधीचं एमडी जप्त, प्रचंड खळबळ