Pune Police | पुणे पोलिसांकडून ‘माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेचे आयोजन; मिळणार रोख बक्षिसे अन् बरंच काही… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांसाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुण्यातील लष्कर पोलिसांकडून (lashkar police) ‘माझी रिक्षा-सुरक्षित रिक्षा’ स्पर्धेचे (my rickshaw safe rickshaw competition) आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजयी ठरलेल्या रिक्षा चलाकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि पुणे पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षा चालकांना रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे (ACP Chandrakant Sangale), लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Senior Inspector of Police Ashok Kadam) उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून पुण्यात अनेक गंभीर गुन्हे घडत असून यामध्ये रिक्षा चालकांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा नवरात्रौत्सवात आयोजित करण्यात आली आहे.

माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा स्पर्धेचे आयोजन 7 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे.
स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या रिक्षा चालकास 11 हजार, द्वितीय 5 आणि तृतीय 3 हजार याप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रिक्षा चालकांनी 5 ऑक्टोबरपर्यंत लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) नाव नोंदणी करावी,
असे आवाहन पोलिसांकडून (Pune Police) करण्यात आले आहे.

Web Titel :- Pune Police | my rickshaw safe rickshaw competition from october 7 in pune Senior Inspector of Police Ashok Kadam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Municipal Corporation Election | प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी, कोणाशी आघाडी करायची याचा निर्णय स्थानिक नेते घेतील – अजित पवार (व्हिडीओ)

Osmanabad Crime | 40 लाखांच्या दुतोंडी मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेले 6 तस्कर गजाआड

Dombivli Gang Rape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण ! आरोपींकडून अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर