Pune Police | कामात हलगर्जीपणा ! पुणे पोलिस दलातील कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | कामात हलगर्जीपणा केल्याचा ठेवत पुणे पोलिसांच्या (Pune Police) खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) कार्यरत असणाऱ्या पोलीस नाईक प्रदीप तानाजी न्यायनीत (Pradeep Tanaji Nyaynit) यांना तडकाफडकी निलंबित (Suspend) करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी काढले आहेत.

 

प्रदीप न्यायनीत यांच्याकडे तपासासाठी असलेल्या गुन्ह्यांचा तपास (Investigation) मुदतीत केला नाही. तसेच न्यायालयात (Pune Court) दोषारोपपत्र (Chargesheet) दाखल करुन आरोपींना योग्य ती शिक्षा होणे आवश्यक असताना न्यायनीत यांनी पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याचे आदेशात नमूद केले आहे. तसेच वरिष्ठांनी वारंवार खुलासा (Clarification) मागवल्या नंतरही खुलासा सादर केलेला नाही. यामुळे प्रदीप न्यायनीत यांनी कर्तव्यपालन करत असताना तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यांचे हे वर्तन नियमातील तरतुदींचा भंग करणारे असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

प्रदीप न्यायनीत यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे.
त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही.
मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक Reserve Police Inspector (RPI) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Police | Negligence at work Sudden suspension of Pune Police personnel Pradeep Tanaji Nyaynit of Khadki Police Station DCP Rohidas Pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा