Pune : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात पुढील पंधरा दिवस (दि. ५ ऑक्टोबर) पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या कालावधीत जमावबंदी असणार आहे. या आदेशानुसार शहरात आंदोलन निदर्शनांवर बंदी घालण्यात आली असल्याचे पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात पुणे जिल्हा सर्वाधिक रुग्ण असणारा झाला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. कोरोनाचा संसर्गामुळे शहरात यापूर्वी लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश कायम राहणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तर सभा, आंदोलने, निदर्शनांवर बंदी घातली आहे. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. शिसवे यांनी दिला आहे. कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेऊन सर्व व्यवहार पार पाडावेत, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like