परराज्यातील कामगारांना मुळ गावी पाठविण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज, समन्वय अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी मिळाल्यानंतर आता त्याचे काम पोलीस ठाणे स्थरावर सुरू झाले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला एक स्वतंत्र पथक निर्माण करण्यात येणार असून त्यांच्याद्वारे या नागरिकांची माहिती एका ठराविक फॉर्ममध्ये गोळा केली जात आहे. तसेच त्या-त्या भागात गट एका व्यक्तीला गट प्रमुख नेमण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्याला आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान समन्वय अधिकारी म्हणून गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (प्रतिनियुक्ती पुणे शहर) सारंग आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढत आहे. आयटी हबच्या शहरात मजुरीसाठी आणि नोकरीनिमित्त परराज्यातील नागरिकांची मोठी संख्या आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर हा नोकरदार आणि मजुरवर्ग पुण्यात अडकून पडला आहे. कोरोनाचा प्रत्येकाने धसका घेतला आहे. यामुळे प्रत्येकजण आप-आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकांनी पायी वाट धरली, तर धुदाच्या, उसाच्या आणि मालवाहतूक टेम्पोतून गाव गाठलं. त्यानंतरही शहरात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. बांद्रा येथे घडलेल्या घटनेनंतर प्रत्येक राज्याने मायदेशी नागरिक येण्यासाठी मागणी केली. यामुळे केंद्र सरकारने नियम आणि अटी तयारकरून परराज्यातील नागरिकांना गावी जाण्यास परवानगी दिली आहे. आता त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने ऑनलाइन माहिती भरण्यास सांगितली. तर नोंदी करून पोलीस आयुक्त त्यांना गावी सोडतील असेही सांगण्यात आले. यामुळें नेमकी कुठे नोंदणी करायची आणि कुठे जायचे या संभ्रमात शनिवारी शहरात एकच गोंधळ उडाला आणि पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात नागरिकांनी तुफान गर्दी केली.

परराज्यातील नागरिकांना मायदेशी पाठविण्याचे काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. पुणे पोलिसांना यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात “मायग्रेन्ट पासेस सेल” (migrant passes cell) सुरू केला आहे. त्यात एक अधिकारी आणि 4 कर्मचारी असणार आहेत. ते या नागरिकांची पूर्ण माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेणार आहेत. तर यासोबत नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. त्यानुसार ही माहिती गोळा केली जाणार आहे. त्यांनतर राज्य अंडी त्यातील जिल्ह्यानुसार नागरिकांचे गट पाढले जाणार असून, त्यातील एक गट प्रमुख असणार आहे. ही पूर्ण माहिती झाल्यानंतर या गट प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांना गावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यास पोलीस मदत करणार आहेत. तसेच त्या- त्या पोलीस ठाण्याच्या परिसरात वाहन उभा करण्यासाठी एक जागा निश्चित केली जाईल. त्यानुसार येथून हे नागरिक आपल्या गावी पाठवले जाणार आहेत.

१) परवानगीसाठी अर्ज भरल्यानंतर ते त्या झोनच्या उपायुक्त यांच्याकडे पाठविले जातील. त्यांनी परवानगी दिल्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती दिली जाईल. तसेच त्यांना सामाजिक अंतर राखणे यासह पूर्ण खबरदारी घ्यावी लागेल.

२) स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना फुड पॅकेट आणि सॅनीटायझर व इतर गरजेच्या वस्तू ची व्यवस्था करायची आहे.

३) सेलमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पीपीई किट असणार असून, पोलीस ठाण्यात गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

५) पोलिसांनी एक मेल आयडी तयार केला असून यामेलवर अर्ज घ्यावे. तर त्या अर्जावर देखील माहिती घेऊन त्यांना गावी जाण्यावबाबत कार्यवाही करावी. तसेच नागरिकांना प्रत्यक्ष न येता ऑनलाइन सुविधेचा वापर जास्त करण्यासाठी सांगावे असे देखील सांगण्यात आले आहे. पोलिसांनी यासाठी covid19.mhpolice.in हा मेलवर नागरिकांनी त्यांची माहिती भरून पाठवायची आहे.

६) समन्वय अधिकाऱ्यांनी ही माहिती मिळाल्यानंतर ही माहिती त्या राज्यातील नोडल अधिकारी यांना पाठवतील. त्यांची परवानगी घेतील. त्यानंतर या नागरिकांना पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ, कंपन्यांचे व्यवस्थपाक यांची यासाठी मदत पोलीस घेणार असून, माहिती गोळा करणे ते त्यांना गावी जाईपरियंत पूर्ण मदत करणार आहेत.

काल घडला फक्त गोंधळ…

परराज्यातील नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी शनिवारी शहरातील विविध पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयात तुफान गर्दी केल्याने एकच गोंधळ उडाला होता. तर पोलिसांना देखील अचानक नागरिक येऊन चौकशी करत असल्याने त्यांना नेमके काय सांगायचे किंवा त्यांच्या नोंदी करून घ्यायच्या की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी काही पोलीस ठाण्यात शासनाने तयार केलेल्या माहितीच्या प्रती देऊन पाठविण्यात आले होते. मध्यवस्तीत असलेल्या तहसील कार्यालयात पोलिसांची कुमक मागवावी लागली. मात्र यामुळे शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.