विशेष पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन, काय काळजी घ्यावी याचे दिले धडे

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांनी कोरोना काळात पोलिसांना मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) यांनी काय काळजी घ्यावी याबाबत आज मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनाचे व्हिडीओ तयार करून ते फेसबुक व ट्विटरवर टाकण्यात आले आहेत.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्याचे पदाधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांना विशेष पोलिस पोलिस अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

ते पोलिसांना कोरोनाच्या लढ्यात मदत करत आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्क आयुक्त अशोक मोरेळे, पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक, डॉ. चेतन खाडे यांनी विशेष पोलिस अधिकाऱ्यांना कोरोना संक्रमित भागात काम करताना काय काळजी घ्यावी, याचे व्हिडीओ तयार केले.

मध्ये सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी, जागतिक आरोग्य संघटना यांनी कोरोना संक्रमित क्षेत्रात काम करता कशी काळजी घ्यावी, या दिलेल्या सूचनांची माहिती या व्हिडीओच्या माध्यमतून दिली. त्यानंतर हे व्हिडीओ पुणे पोलिसाच्या ट्टिवटर व फेसबुक अकाउंट प्रसारित करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ पाहून काम करावे, अशा सूचना या विशेष पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.