‘ती’ निव्वळ अफवा, धान्याचा अनावश्यक साठा करू नका : पुणे पोलिस

पुणे : पोलिसनामा ऑनलाइ – पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याची अफवा सोशल मिडीयावर पसरली असून, त्यामुळे अनेक जण अत्यावश्यक वस्तूंचा साठा करत आहेत. वास्तविक पाहता जिवनावश्यक वस्तूंचा साठा मुबलक असून व्हायरल होत असलेला मॅसेच चुकीचा असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे कोणीही धान्याचा साठा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. व्यंकटेशम म्हणाले, शहरात कन्टेंन्टमेंट आणि नॉन कन्टेंन्टमेंट झोन करण्यात आले आहेत. कन्टेन्टेन्टमेंट झोन मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य काळजी घेतली आहे. त्याचा परिणाम चांगला झाला असून, शहरातील 21 ठिकाणी रूग्ण संख्या कमी झाली आहे. परंतु, नॉन कन्टेंटमेंट झोनमध्ये खरेदीच्या निमित्ताने नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नवीन रूग्ण सापडत आहेत. त्यासाठी नारिकांनी स्वतः योग्य ती काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच विमान तळावरून घरी जाण्यासाठी सॅनिटाईझ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच तुमचा बोर्डींग पासच हा तुमच्या वाहतुकीचा पास असणार आहे. तुम्ही एखादे वाहन विमानतळवार स्वतःला नेण्यासाठी बोलवणार असाल तर बोर्डींग पासचा वॉट्सअ‍ॅपचा फोटो संबंधीत वाहन चालकाला पाठवून तुम्ही इच्छित स्थळी जाऊ शकता सांगितले.