पुणे पोलिसांनी 2 ऑम्बुलन्स राखीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत व त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आता दोन रुग्ण वाहिक उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. आज त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. एका महिला कर्मचाऱ्यास रुग्ण वाहिक मिळाली नव्हती. त्यानंतर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

शहरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यात 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील याची लागण होत आहे. अश्यावेळी त्यांना उपचार मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे काही प्रकरणात दिसून आले आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी वाहतूक विभागात नेमणुकीस असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यास रुग्ण वाहिका न मिळाल्याने तबल 5 तास रुग्णालयात जाता आले नाही. त्यांनी नियंत्रण कक्षाशी देखील संपर्क साधला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. याची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संपर्क साधतात या रुग्ण वाहिक मदतीसाठी येणार आहेत. पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबियासाठी 24 विनामूल्य या रुग्णवाहिका असणार आहेत.

मुख्यतः याची जबाबदारी ही नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यानंतर उपलब्ध प्रभारी अधिकारी यांनी मोटार परिवहन विभाला संपर्ककरून ती रुग्णवाहिक पाठवायची आहे. मोटार परिवहन विभागाने तात्काळ जाऊन त्यांना रुग्णालयात घेऊन जायचे. यानंतर रुग्णवाहिका निर्जुकीकरणं करायची आहे. तसेच त्याबाबत मोटार परिवहन विभाग आणि नियंत्रण कक्षाला नोंद ठेवायची आहे. दरम्यान यात काही अडचण आल्यास सहायक आयुक्त सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि पोलीस नाईक अमोल क्षीरसागर तसेच सतीश गाडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिक उपलब्ध करून देण्यात आल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like