Pune Police News | पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच (Crime Branch Unit-5) मधील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. पोलीस हवालदार दिपक शिवराम लांडगे (Police Constable Deepak Shivram Landge) असे निलंबित (Police Suspend) करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी काढले आहेत. (Pune Police News)

 

दिपक लांडगे पुणे पोलीस दलातील (Pune Police) पोलीस अंमलदार व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. लांडगे यांनी शिस्तबद्ध पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असताना पोलीस दलातील कायदा व शिस्तिची जाण असतानाही बेशिस्त व अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

दिपक लांडगे यांना शुक्रवार (दि.3 मार्च) पासून शासकीय सेवेतून निलंबित (Police Suspended) करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. निलंबन काळात निर्वाह भत्ता (Subsistence Allowance) मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला निलंबन वेतन घेण्यापूर्वी निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकरची खासगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र (Certificate) सादर करण्याचे आदेशात नमूद केले आहे. (Pune Police News)

दिपक शिवराम लांडगे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे.
निलंबन कालावधीत मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही.
मुख्यालय सोडायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त, प्रशासन व पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे
यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल,
असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Advt.

Web Title :- Pune Police News | A police officer in the crime branch has been summarily suspended for verbally abusing a police officer and a police inspector

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे चुकले! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले- ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर…’

Mumbai Crime News | अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, धर्मेंद्रच्या निवासस्थानी बॉम्बस्फोटाची धमकी, आरोपीला पुण्यातून अटक

NAAC | राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन अनिवार्य; अन्यथा प्रवेशप्रक्रिया होणार रद्द