×
Homeताज्या बातम्याPune Police News | पुणे पोलीस दलातील एपीआय संभाजी गुरव यांची अभिमानास्पद...

Pune Police News | पुणे पोलीस दलातील एपीआय संभाजी गुरव यांची अभिमानास्पद कामगिरी, दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर केली यशस्वी चढाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे पोलीस दलातील शीघ्र कृती दलात (Rapid Action Force) कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव (API Sambhaji Guruv) यांनी अॅडिज पर्वत रांगेतील दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना येथील सर्वोच्च शिखर माऊंट अकानकागुआ (Mount Acancagua) हे 23 हजार फूट उंचीचे शिखर सर केले आहे. गुरव यांनी 23 मे 2021 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस केला असून त्यातील ही पाचवी मोहिम त्यांनी यशस्वी फत्ते केली आहे. (Pune Police News)

 

शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कामाचा व्याप सांभाळून संभाजी गुरव यांनी या मोहिमेची तयारी केली. मुंबई ते दुबई (Dubai) आणि दुबई ते रिओ द जनेरिओ पुन्हा रिओ द जनेरिओ (Rio de Janeiro) ते बूनिस एअरस व शेवटी बुनस ते मेंडोजा असा विमान प्रवास करुन ते मोहिमेपर्यंत पोहचले.

 

या मोहिमे संदर्भात बोलताना गुरव (Pune Police News) म्हणाले, माऊंट अकानकागुआ या पर्वतावर सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने प्रचंड प्रमाणात थंडी जाणवते. या ठिकाणचे तापमान उणे 20 डिग्री पर्य़ंत असते. तसेच हा पर्वत दोन्ही महासागरांच्या मधोमध असल्याने याठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असतो. या शिखराचा माथा हा 23 हजार फूट उंचीवर असल्याने या ठिकाणी ऑक्सिजन पातळी कमी असते.

बर्फवृष्टी (Snowfall) मोठ्या प्रमाणात असल्याने चांगल्या हवामानात वैद्यकीय तपासणी करुन गिर्यारोहकांना पुढची वाटचाल करता येते.
2021 मध्ये जगातील सर्वोच्च शिखऱ माउंट एव्हरेसट सर केल्यानंतर जगातील सात खंडातील सातही सर्वोच्च शिखऱे एका वर्षात सर करण्याचा मानस होता. मात्र कोरोनामुळे यात अडचणी आल्या.
26 जुलै 2021 रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस (Elbrus) सर केले.
त्यानंतर 15 ऑगस्ट 2021 रोजी अफ्रिका खंडांतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) शिखर सर केले.
तसेच 29 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोजी अस्को (Mount Koji Asko)
शिखर सर केले. आणि आता माझ्या गिर्यारोहण मोहिमेतील पाचवी मोहिम संपन्न झाली आहे.

 

माझ्या या मोहिमेमध्ये मला नेहमीच आर्थिक आणि मानसीक पाठबळ देणारे माझे सर्व मित्र हितचिंतक आणि
खास करून माझे सत्र क्र 103 मधील सर्व सह अधिकारी तसेच
पोलीस महासंचालक (प्र) संजय कुमार (Director General of Police Sanjay Kumar),
पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar), पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R. Raja) या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

 

Web Title :- Pune Police News | api sambhaji gurav climbs the highest peak in south america

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | एकाच कुटुंबातील 7 जणांच्या आत्महत्येचे गुढ उकलले, मुलाने मुलीला पळवून नेलं अन्…, पुणे जिल्ह्यात खळबळ

Jayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘लोक फार हुशार आहेत, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना…’

Devendra Fadnavis | या दिवशी होणार राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तारिख

Must Read
Related News