Pune Police News | सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुण्यातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Pune Police News)

 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वारगेट पोलीस ठाण्यातील (Swargate Police Station) बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Sr PI Ashok Indalkar), पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव (PI Somnath Jadhav) आदी उपस्थित होते. (Pune Police News)

 

पाटील म्हणाले, कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, बालस्नेही कक्षात येणारे अत्याचारित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालक बोलके व्हावे, गुन्ह्याची नोंद होईपर्यंत त्यांच्या बसण्याची, रमण्याची, खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कक्ष उभारण्यासाठी सामाजिक उत्तर दायित्व निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल.

 

आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळाला नाही, न्यायालयात गतीने खटले दाखल करुन चालवले आणि गुन्हे सिद्धतचे प्रमाण वाढून शिक्षा झाल्यास आरोपींच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यावेळी श्री. पाटील म्हणाले.

 

यावेळी पाटील यांनी मुलांना खेळणी व खाऊचे वाटप केले तसेच गुलटेकडी येथील सेठ दगडूराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन’चे व्यवस्थापक शकील शेख यांचा कक्ष उभारणीमध्ये केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

 

असा आहे ‘बालस्नेही कक्ष
आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे परिसरातील रंगरंगोटी व स्वच्छता तसेच नुतनीकरण पुणे पोलीस मास निधीतून करण्यात आले आहे.

कायद्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल कल्याण कल्याण पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे.
बालकांचे जबाब नोंदवितांना त्यांच्यावर दडपण येऊ नये यासाठी हे बालकल्याण पोलीस अधिकारी पिडीत बालक,
विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत संवाद साधतील तसेच त्यांना समुपदेशन करण्यात येईल.
अत्याचारग्रस्त पिडीत बालक त्यांच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती विश्वासाने व मनमोकळेपणाने
देण्यासाठी कक्षात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी येथे प्रयत्न केला जाणार आहे.

 

बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी त्यास प्रोत्साहित करणे.
बालक गैरवर्तन करु नये याकरीता त्यांच्यामनात सकारात्मक विचार निर्माण करणे.
बालकाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यासोबत त्यास समुपदेशन व मानसशास्त्रीय आधार
किंवा वैद्यकीय उपचार देणे आदी काम या ठिकाणी होणार आहे.
स्वारगेट पोलीस ठाणे व होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन
यांच्या समन्वयाने बालस्नेही कक्षाचे कामकाज करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Police News | Child Friendly Cells to be established in all Police Stations soon – Guardian Minister Chandrakant Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती