Pune Police News | माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर ‘ब्रेन डेड’ झालेले पुणे पोलिस दलातील स्वप्नील गरड यांचं निधन; पुणे पोलिस दलावर शोककळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Police News | पुणे पोलिस दलातील स्वप्नील गरड (Police Naik Swapnil Garad) यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांचे ‘ब्रेन डेड’ झाले होते. त्यांना काठमांडू (Kathmandu) येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. मात्र, उपचारादरम्यान आज दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे (Pune Police News). त्यामुळे संपुर्ण पुणे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

 

स्वप्नील गरड हे पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत (EoW Pune) कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर (Mount Everest) सर करण्यासाठी गेले होते. माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे.

स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केले आहेत.
(Pune Police News) दरम्यान, स्वप्नील गरड यांनी मागील
वर्षी जगातील सार्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण
असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम (Mount Ama Dablam in Nepal) हे शिखर सरक केले होते.
हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.

 

Web Title :  Pune Police News | Death of Swapnil Gard of Pune Police Force who became ‘brain dead’ after climbing Mount Everest; Mourning for Pune Police Force

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jalna ACB Trap News | 32 हजाराची लाच घेणार्‍या सरपंचास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले

Devendra Fadnavis | कोणत्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा (व्हिडिओ)

Sameer Chaugule | ‘त्या’ नृत्यामुळे हास्यजत्रा फेम समीर चौघुलेंना मागावी लागली जाहीर माफी