Pune Police News | पुणे पोलिस : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

नागरिकांनी पोलिसांना प्रोत्साहन देणे गरजेचे- पालकमंत्री

पुणे : Pune Police News | पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणे, त्यांना सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Pune Police News)

पुणे शहर पोलीस (Pune City Police) मुख्यालय मैदान (Shivaji Nagar Police Ground Pune) येथे पुणे शहर पोलीस दलातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते (Pune Police HQ) . कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. (Pune Police News)

पालकमंत्री पाटील म्हणाले, मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम अभिनव असून त्याद्वारे मुद्देमाल मिळालेल्यांना समाधान मिळते आणि जनतेत पोलिसांविषयी चांगला संदेश जातो, विश्वासाची भावना निर्माण होते. त्यासोबत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळते.

एखादा गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करण्यासोबत झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावून गुन्हेगाराला शिक्षा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण होते. गुन्ह्याच्या मागे एकप्रकारचे मानसशास्त्र असते. गुन्ह्याचा तपास (Pune Crime News) करताना पोलिसांना खूप परिश्रम करावे लागतात. त्यामुळे चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्याप्रकारे करतात. पोलिसांना अद्ययावत शास्त्र, साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Advt.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, गुन्हे उघडकीस आल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते.
पोलीस अधिकारी परिश्रमपूर्वक हे काम करतात आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित
केला जातो. असा सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल कार्यक्रमात हस्तांतरित करण्यात येत आहे,
अशी माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ५८ नागरिकांना मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला आणि चांगली कामगिरी
करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पालकमंत्र्यांनी स्वतः भेटवस्तू देऊन या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Web Title :  Pune Police News | Guardian Minister Chandrakant Patil handed over 5 crore 75 lakh rupees to citizens

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर पोलिस स्टेशन – पोलिसात तक्रार मागे घेण्यासाठी रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण

Pune Crime News | कारच्या धडकेत रस्ता सफाई करणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे -सासवड रोडवरील सातववाडी येथील घटना

CM Eknath Shinde | काल ‘सागर’ बंगल्यावर खलबतं, एकनाथ शिंदे पाठोपाठ देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना;
राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Politics News | जावळीत राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना धक्का,
ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश