250 पीपीई कीट्सचे पुणे पोलीसांना वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाविरुद्धची लढाईत पुणे पोलिसांना युवा उद्योजक सुशील बंग यांच्यावतीने 250 पीपीई किट्स, मास्क, ग्लोव्हज भेट देण्यात आले. त्यामुळे या महामारीत पोलिसांना याचा मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस यांच्या हस्ते हे किट आज अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे यांना दिले. यावेळी परिमंडळ एकच्या उपायुक्त स्वप्ना गोरे व अधिकारी उपस्थित होते. डीआरडीओ संस्थेने मान्य केलेली कीट्स पोलीसांना उपयुक्त ठरणारी आहेत. अनेकवेळा कोरोनाबाधित रुग्णांना हलविताना पोलीसांची गरज भासते. अशावेळी ही कीट्स त्यांच्यासाठी सुरक्षाकवच म्हणून उपयुक्त ठरणारी आहेत. यातील काही कीट्स महिला पोलीसांसाठी उपयुक्त अशी बनविण्यात आली आहेत त्यामुळे त्यांना ती सहजपणे वापरता येतील.

अनेक संकटे, अडथळे आले. पण तरीही धीर खचू न देता पोलीसांचे काम चालूच आहे. आणि हे प्रेरणादायी आहे. असे यावेळी मोहन जोशी यांनी मत व्यक्त केले. कोरोनाविरूद्धच्या लढाईत मार्च महिन्यापासून पुण्यातील पोलीस अतिशय धैर्याने आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्ण तसेच या संसर्गाने प्राण गमावलेले रुग्ण यांना हलविण्याची जोखीम खूप वेळा पोलीसांनीच प्राधान्याने घेतलेली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिलेला आहे. हे काम करताना पोलीसाना देखील कोरोनाची लागण झाली. तर अनेकजण आजारी पडले आहेत. तरीही धीर खचू दिला नाही. निष्ठेने काम चालूच ठेवले आहे, असे यावेळी ते म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like