Pune Police News | पुणे : एक लाख रुपयांचे बक्षीस ! बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्यांचा बक्षीस देऊन पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | नांदेड सिटी (Nanded City) परिसरातून एक 12 वर्षीय शाळकरी मुलीला दुपारी दीडच्या सुमारास सिंहगड रोड येथील सार्वजनिक रोडवरुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) दाखल करण्यात आली होती. ही घटना 18 एप्रिल रोजी घडली होती. मुलीचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जाहीर करण्यात आलेली बक्षीसाची रक्कम पाच जणांना विभागून देण्यात आली.(Pune Police News)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुलीचा फोटो व्हायरल केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीच्या आधारे शिवाभाऊ पासलकर यांनी हरवलेल्या मुलीची माहिती त्यांच्या महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसारित केली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह मुलीचा शोध घेण्यासाठी पुणे शहर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

बेपत्ता झालेली मुलगी गुरुवारी सायंकाळी रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात सापडली.
मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले.
मुलीचा शोध घेण्यासाठी शिवाभाऊ पासलकर, शरद मंजाभाऊ घोडके, संभाजी अशोक सातव, युवराज इरभान वानखेडे,
संजय पाटीलबुआ गाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
पोलिसांनी जाहिर केलेले एक लाख रुपयांच्या बक्षीसाची रक्कम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सोमवारी (दि22)
पाच जणांना विभागून देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने व प्रत्येक्ष सहभागाने पोलीस सह आयुक्त प्रविण पवार,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी व
पोलीस अंमलदार यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anant Geete On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? शिवसेना नेते अनंत गीतेंनी केला गौप्यस्फोट, ‘या’ बड्या नेत्याचं नाव घेतल्याने खळबळ!

Mahavir Jayanti | महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त बिबेवाडी गंगाधाम येथे भव्य शोभायात्रा; मिरवणुकीत आमदार माधुरी मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ सहभागी