Pune Police News | पोलिसांच्या धडक कारवाईने ‘व्हॉईट क्रिमिनल’ हादरले; बांधांवर जाऊन केले 100 % पैसे परत, पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Police News |भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) bhaichand hirachand raisoni पंतसंस्थेच्या तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे jintendra kandare यानेच इतरांना हाताशी धरुन गुंतवणुकदारांना लुबाडले. गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवीच्या ४० टक्के पैसे घेऊन १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेऊन कर्जदार कंपन्यांनी स्वत:चे उखळ पांढरे करुन घेतले होते. पुणे शहर पोलीस दलाच्या pune city police आर्थिक गुन्हे शाखेने economic offences wing pune धडक कारवाई केल्यानंतर या कंपन्यांचे संचालक हादरले. अगोदर दारातही उभे न करणार्‍या या कंपन्यांनी अटक टाळण्यासाठी चक्क शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पैसे देण्यास सुरुवात केली आहे. Pune Police News | pune city police crackdown White Criminals, 100% refund by incident in Pune district

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे जिल्ह्यातील (Pune) इंदापूर तालुक्यातील (Indapur) निमगाव केतकी (Nimgaon Ketaki) या गावातील सर्व शेतकर्‍यांना त्यांनी पतसंस्थेत गुंतवलेले सर्व १०० टक्के पैसे परत मिळाले आहेत.
निमगाव केतकी येथील बीएचआरच्या (BHR) शाखेमध्ये जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या ठेवी शेतकर्‍यांनी ठेवल्या होत्या.
त्यापैकी जवळपास पावणे दोन कोटी रुपये ठेवीदारांना परत मिळाले आहेत.
पुणे पोलीस दलाच्या (Pune City Police) आर्थिक गुन्हे शाखेने economic offences wing भाईचंद हिराचंद रायसोनी bhaichand hirachand raisoni पतसंस्थेत गैरव्यवहार करणार्‍यांवर सातत्याने धाडी टाकून कारवाई केली. आतापर्यंत १८ जणांना अटक केली.
त्याशिवाय या पतसंस्थेचे कर्जदार असणारे व ज्यांनी लोकांचे ४० टक्के पैसे परत करुन १०० टक्के पैसे परत मिळाल्याचे लिहून घेतले.

अशा सर्वांच्या चौकश्या सुरु केल्या होत्या.
त्यामुळे ओम शिवम बिल्ड कॉन या कंपनीचे प्रतिनिधी डाळींब उत्पादक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना तुमचे उरलेले ६० टक्के पैसे परत करतो.
असे सांगून त्यांना बोलावून नोटरी करुन तातडीने त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरीत करु लागले.
गेल्या १० दिवसांपासून त्यांनी ही कारवाई सुरु केली.
पुणे पोलीस आपल्याला अटक करीत या भितीने त्यांनी हे पैसे परत केले.
निमगाव केतकी या एकाच गावातील ६४ जणांचे पैसे या कंपनीने परत केले आहेत.

गावातील फक्त एका जणाचे पैसे देणे बाकी आहे. त्यालाही शोधण्याचे काम कंपनीचे प्रतिनिधी करीत आहेत. त्याशिवाय या कंपनीने ज्यांच्याकडून १०० टक्के पैसे परत मिळाले असे लिहून घेऊन फसवणूक केली होती. त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता pune police commissioner amitabh gupta, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे additional commissioner of police ashok morale यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, deputy commissioner of police bhagyashree navtake पोलीस निरीक्षक सुचेता खोकले Police Inspector Sucheta khokale व त्यांच्या पथकांनी बीएचआरवर धडक कारवाई केली.
त्यामुळेच आम्हाला हे पैसे परत मिळाले अशी भावना ठेवीदारांनी व्यक्त केली.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले व त्यांच्या सहकार्‍यांनी एक महिन्यापूर्वी निमगाव केतकी व परिसरातील गावात जाऊन सर्व्हे केला.
थेट शेतकर्‍यांच्या घरी जाऊन त्यांनी बीएचआरमध्ये किती ठेवी ठेवल्या होत्या, याची माहिती गोळा केली. त्यामुळे आता आपला नंबर लागणार असे वाटल्याने या कंपनीने पैसे परत केले आहेत.

ठेवीदारांची फसवणुक करुन ज्या कर्जदारांनी अशा प्रकारे आपले कर्ज फेटल्याचे दाखविले आहे.
त्यांनी पुढे येऊन उरलेले ६० टक्के पैसे ठेवीदारांना परत केले तर ते कारवाईपासून वाचू शकतील,
असे तपासी अधिकारी सुचेता खोकले यांनी सांगितले.

Web Title : Pune Police News | pune city police crackdown White Criminals, 100% refund by incident in Pune district

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LTC Cash Voucher Scheme | 50 लाखापेक्षा जास्त केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फायद्याची गोष्ट, LTC Bill बाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Pune Crime News | पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमधील 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम व बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावून शूटिंग?