Pune Police News | पुण्यातील पोलिस ‘हायटेक’ ! पोलिसानं सहकार्‍याकडूनच घेतली ‘फोन पे’व्दारे (PhonePe) लाच

पुणे न्यूज (Pune News) :  नितीन पाटील (Nitin Patil) – पुणे तिथं काय उणे असं म्हंटलं जातं. पण पुणे पोलिस दलातील (pune city police) घडलेल्या एका घटनेवरून ते सत्यच असल्याचं जाणवतं. पुण्यातील पोलिस दंडात्मक कारवाई करताना क्रेडिट / डेबीट कार्डव्दारे, पेटीएम Paytm, फोन पे PhonePe, G-Pay आणि बँक ट्रान्सफरव्दारे रक्कम स्विकारतात. ते पुणेकरांसाठी फायद्याचं देखील ठरलेलं आहे. मात्र, आता पुणे शहर पोलिस दलातील (Pune Police News) एक भलताच प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील (Warje Malwadi Police Station) तत्कालीन डयुटी अंमलदार (डिओ) चक्क सहकारी पोलिस कर्मचार्‍याकडून फोन पे व्दारे लाच स्विकारचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी चौकशीअंती संबंधित पोलिस कर्मचार्‍याला निलंबीत (police suspended) केले आहे. त्याबाबतचे आदेश आज (सोमवारी) काढण्यात आले आहेत.

पोलिस कर्मचारी प्रमोद विक्रम कोकाटे (Pramod Vikram Kokate) (बक्कल नं. 10152) असं निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍याचं नाव आहे. दरम्यान, कोकाटे हे वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. यापुर्वी वारजे पोलिस ठाण्यातच त्यांच्याकडे डयुटी अंमलदार (डिओ) पदभार होता. त्यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याला (Police personnel) वेळावेळी त्रास दिला. संबंधित पोलिस कर्मचार्‍याला काम शिकायचे असल्याने त्यांनी मुग गिळून तोंड गप्प केले. मात्र, कोकाटे यांचा त्रास वाढतच गेला. दरम्यान, कोकाटे यांनी संबंधित पोलिस कर्मचार्‍याकडून दि. 26 नोव्हेंबर 2019 आणि दि. 14 जानेवारी 2020 रोजी फोन पे वरून लाच घेतली. वेळावेळी कोकाटे हे त्रास देत असल्यानं संबंधित पोलिस कर्मचार्‍याने कोकाटे यांची तक्रार केली.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी प्रकरणाची चौकशी सिंहगड रोड विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे दिली. चौकशीमध्ये कोकाटे यांनी फोन पे वरून पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कोकाटे यांनी ते पैसे ऊसने घेतल्याचा जबाब दिला. पुन्हा संबंधित पोलिसाचा जबाब घेतल्यानंतर कोकाटे यांनी ऊसने पैसे नव्हे तर लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोकाटे यांच्यावर आज (सोमवारी) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसानं सहकारी पोलिस कर्मचार्‍याकडून फोन पेव्दारे लाच घेतल्याचं समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Titel :- Pune Police News | Pune police Hitech ! Police took bribe from a colleague through PhonePe

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक