Pune Police News | पुणे पोलिसांकडून आदान-प्रदान कार्यक्रम, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार

0
2001
Pune Police News | Pune police will monitor the movement of criminals in exchange program, Sarai
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे शहरामध्ये वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police News) आदान-प्रदान (Exchange) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी झोन तीनमधील (Zone Three) सर्व सराईत गुन्हेगारांची (Criminals) शाळा घेण्यात आली. यामध्ये तब्बल 140 गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात आली असून त्याचे नव्याने ब्राऊझर तयार केले आहे. (Pune Crime News)

 

पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगने (Koyta Gang) दहशत माजवली आहे. यामध्ये नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या मुलांचे प्रमाण जास्त आहे. दोन गटातील वाद आणि किरकोळ कारणावरुन होणारी हाणामारी यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टोळक्यांकडून हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवली जात आहे. सराईत गुन्हेगार केवळ आपल्याच भागात दहशत माजवत नाहीत तर दुसरीकडे जाऊन त्याठिकाणी दहशत निर्माण करत आहेत. (Pune Police News)

 

शहरातील वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांनी शरिराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय त्यांची सर्व माहिती एकत्रीत करण्याचे आदेश दिले आहेत.

यापार्श्वभूमीवर झोन तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांनी हद्दीतील सर्व गुन्हेगार आदान-प्रदान कार्य़क्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे नियोजन कोथरुड पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी 140 गुन्हेगारांनी हजेरी लावली. त्यात स्थानिक पोलिसांचे तपास पथक (Investigation Team) व अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी सर्व गुन्हेगारांची माहिती, त्यांचे सध्याचे फोटो, सध्याचा राहण्याचा पत्ता, करत असलेल्या कामाची माहिती, कोणासोबत फिरतात, मोबाईल क्रमांक ही माहिती घेण्यात आली. या सर्व माहितीचे नवीन ब्राऊझर तयार केल्यामुळे झोनमधील सर्व गुन्हेगारांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याकडे असणार आहे. तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार असून या आदान-प्रदान कार्यक्रमामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहणार आहे.

 

झोन तीन हद्दीतील गुन्हेगार, टोळी आणि अल्पवयीन मुलांवर वचक ठेवला जात आहे.
आदान-प्रदान कार्यक्रमातून गुन्हेगारांची पुर्ण माहिती घेण्यात आली आहे.
त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवण्यासाठीच सर्व पोलीस ठाण्यांना झोनच्या गुन्हेगारांची माहिती मिळाली आहे.
अशा प्रकारचा कार्यक्रम प्रत्येक पोलीस ठाण्यात घेणार असल्याची माहिती झोन तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिली.

 

Web Title :- Pune Police News | Pune police will monitor the movement of criminals in exchange program, Sarai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘आजच्या घडीला संजय राऊत राजकारणातील जोकर’ – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट