Pune Police News | खाकी वर्दीतील रणरागिनी महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे हत्येची घटना टळली, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून सत्कार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | नागरिकांमध्ये दहशत पसरवून कोयत्याने वार केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. मात्र, एका जिगरबाज महिला कर्मचाऱ्यामुळे खुनाची घटना टळली. चंदननगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस (Pune Police News) कर्मचारी सीमा मानसिंग वळवी (Police Constable Seema Man Singh Valvi) यांच्या सतर्कतेमुळे हत्येची घटना टळली. सीमा वळवी यांनी धाडस दाखवून कोत्याने वार करणाऱ्यांचा प्रतिकार केला. एवढंच नाहीतर पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले.

चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार सीमा वळवी या रात्रीचा बंदोबस्त संपवून घरी जात होत्या. त्यावेळी वडगाव शेरी (Vadgaon Sherry) येथील दिगंबरनगर येथे गर्दी दिसल्याने त्या थांबल्या. त्यांनी पाहिले की, काही तरुण कोयत्याने मारहाण करत आहेत. त्यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना दरडावले. त्यावेळी काहींनी तेथून पळ काढला. मात्र, एकाने कोयता काढून दुसऱ्या तरुणावर वार केले. सीमा वळवी यांनी यांनी प्रतिकार करुन जखमी तरुणाची सुटका केली. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. एकट्या सीमा वळवी यांनी आरोपींना प्रतिकार केला.

एका आरोपीला पकडून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली. चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस येईपर्यंत सीमा वळवी यांनी एकाला पकडून ठेवले. तसेच इतर आरोपींना पकडता यावे यासाठी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे हत्येची घटना टळली. सीमा वळवे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी पकडले गेले. सीमा वळवे यांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या घटनेनंतर चंदननगर पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटांमध्ये पाच आरोपींना ताब्यात घेतले. अनुज जितेंद्र यादव (वय-19 रा. वडगाव शेरी), हरिकेश टुणटुण चव्हाण (वय-18), आकाश भारत पवार (वय-23), अमोल वसंत चौरघडे, संदेश सुधिर कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सौरभ संतोष पाडाळे (वय-22 रा. वडगाव शेरी), ऋषिकेश ढोरे, अभि आगरकर, योगेश कदम हे जखमी झाले आहेत.

महिला पोलीस अंमलदार सीमा वळवी यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस आयुक्त रितेश कुमार
(IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate), संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे
(Sr PI Rajendra Landge), पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील (PI Manisha Patil) व इतर
टीमने अभिनंदन करुन सीमा वळवी यांचा सत्कार केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dark Underarms Home Remedies | Dark Underarms मुळे लग्नात स्लीव्हजलेस घालणे होते कठीण, जाणून घ्या कसा दूर होईल अंडरआर्म्सचा काळेपणा…

Pune Pimpri Chinchwad Crime News | वाइन शॉपमध्ये चोरी, रोख रक्कम, दारुचे बॉक्स लंपास

Room Heater Side Effects | हिवाळ्यात रूम हीटर वापरा जपून, नाहीतर एका चूकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव…