Pune Police News । RTI कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेचे 9 ‘फॉलोअर्स’ पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Police News । महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) mokka (Mcoca) लावलेल्या फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता RTI रवींद्र बऱ्हाटेला (rti activist ravindra barate) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) मंगळवारी (6 जून) रोजी ताब्यात घेतले. समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून 9 जणांकडून रवींद्र बऱ्हाटेला (rti activist ravindra barate) वारंवार फॉलो केले जात होते. यावरून गुन्हे शाखेकडून संबंधितांची माहिती गोळा केली जात आहे. आता पोलिसांकडून त्याच्या समाज माध्यमांचा धांडोळा घेतला जातोय. यावरून बऱ्हाटेच्या पोस्टला लाईक करणे, प्रत्येक व्हिडीओ बघणे, वारंवार त्याचे फेसबुक पेज ओपन करणाऱ्यांची माहिती तपासण्यात येत आहे. pune police news | rti activist ravindra barate nine followers crime branch

आरोपी रवींद्र बऱ्हाटेला (rti activist ravindra barate) सध्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) अटक केली आहे. अटक केल्यानंतर आता पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
यानंतर आता गुन्हे शाखेकडून बऱ्हाटेचा सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्ती, गुपित पद्धतीने फोनवर संपर्क साधणारे, तसेच, त्याने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडिओ सतत बघून लाईक करणाऱ्यांची माहिती सविस्तर एकत्र केली आहे.
त्यावर देखरेख ठेऊन कारवाई करणार असल्याचं वरिष्ठ पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

समाज माध्यमांवर सक्रिय झाल्यानंतर रवींद्र बऱ्हाटेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या बाबीवर देखरेख ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे.
काही दिवसांपुर्वी बऱ्हाटे फेसबुकवर व्हिडिओ (Video) व्हायरल करून पोलिसांवर आरोप केले होते. त्यानंतर बऱ्हाटेला मदत करणाऱ्यांचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांनी सुरूवात केली होती.
यानुसार या कटात सामील असलेल्या रवींद्र बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि मुलगा मयूरला अटक करण्यात आलं.
चौकशी दरम्यान फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओ बाबत महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागले.
यानंतर अ‍ॅड सुनील मोरे (advocate Sunil More) यांनाही अटक करण्यात आली होती.
त्यानंतर मंगळवारी गुन्हे शाखेने रवींद्र बऱ्हाटेला अटक केली आहे.

या दरम्यान मुख्यतः म्हणजे रवींद्र बऱ्हाटेने फेसबुकवर काही दिवसांपुर्वी प्रथम व्हिडीओ अपलोड केला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात असलेल्यांची माहिती गोळा करण्यात आली.
त्यात सगळे व्हिडीओ आणि ऑडीओ बनवून व्हायरल करण्याच्या कामामध्ये
आरोपी पितांबर धिवार याने रवींद्र बऱ्हाटेला सहकार्य केल्याचे पोलीस तपासात समजले.
त्यानुसार त्याला अटक केली आहे.
तसेहच, रवींद्र बऱ्हाटेने फेसबुकवर अपलोड केलेले व्हिडीओ वारंवार बघणे,
लाईक आणि शेअर करणाऱ्यांची संख्या 9 वर पोहोचली होती.
म्हणून रवींद्र बऱ्हाटे आणि संबंधित 9 फॉलोअर्स यांचा संबंध काय आहे.
याचा तपास आता गुन्हे शाखा पोलीस (Crime Branch Police) करीत आहेत.

Web Title : pune police news | rti activist ravindra barate nine followers crime branch

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | ‘या’ मोठया आर्थिक घोटाळयात पहिल्यांदाच भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदाराचं आलं प्रकाशझोतात, पुणे पोलिस घेताहेत युध्दपातळीवर शोध

Modi Cabinet Expansion । राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Anti Corruption Bureau Pune | दौंड तालुक्यातील यवतमध्ये तलाठयास 30 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं पकडलं