Pune Police News | पुणे पोलिसांकडून माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pune Police News | खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला (rti activist ravindra barate) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बर्‍हाटे फरार होता. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. शहरातील विविध पोलिस ठाण्यात रवींद्र बर्‍हाटे याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

रवींद्र बर्‍हाटे (rti activist ravindra barate) याच्याविरूध्द चतुःश्रृंगीसह शहरातील वेगवेगळया पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काही दिवसांपुर्वीच त्याची पत्नी संगीता रवींद्र बर्‍हाटे यांना देखील अटक केली होती. गुन्ह शाखेच्या पोलिसांनी त्यानंतर बर्‍हाटेच्या मुलाला देखील अटक केली. त्यानंतर पोलिसांनी बर्‍हाटेला मदत करणार्‍या सुनील मोरे याला देखील अटक केली. बर्‍हाटेसह बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, तथाकथित पत्रकार देवेंद्र जैन, सांगलीचे संजय भोकरे आणि इतरांविरूध्द गुन्हे आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (pune joint police commissioner dr ravindra shisve), अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shreeniwas ghatge), सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख (assistant commissioner of police surendra deshmukh), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate ) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांच्या पथकाने रवींद्र बर्‍हाटेला अटक केली आहे.

Web Title : Pune Police News | RTI activist Ravindra Barhata arrested by Pune police

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

sakshana salgar | राष्ट्रवादी युवती सेल आक्रमक, म्हणाल्या – ‘…तर पडळकरांच्या बगलबच्चांना घरात घुसून मारू’

Baramati Police News | बारामती पोलिस उपमुख्यालयासाठी 300 पदे भरण्यास मंजूरी

Baramati Crime News । ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर गोळीबार, माळेगावच्या माजी सरपंचाला अटक