Pune Police News | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेचा साथीदार अन् मोक्का मधील फरार आरोपी प्रशांत जोशी अटकेत; गुन्हे शाखेनं कोथरूड परिसरातून उचललं

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पुणे शहरातील (Pune City) पर्वती (Parvati) सहकारनगर (Sahakarnagar) येथील वादग्रस्त जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI activist pune) रवींद्र बऱ्हाटे (Ravindra Barhate) सह त्याच्या इतर साथिदारांवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या टोळीविरोधात पुणे शहरातील (Pune City) विविध पोलीस ठाण्यात गुन्हे (Pune Police Stations) दाखल झाले आहे. या टोळीवर पुणे पोलिसांनी (Pune Police News) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) कारवाई (MCOCA Action) केली आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी प्रशांत पुरुषोत्तम जोशी (Prashant Purushottam Joshi) याला पुणे गुन्हे शाखा (Pune Crime Branch Police) युनिट 1 च्या पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

पर्वती येथील एका वादात असलेल्या जमिनीचे गैरव्यावहार केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे (rti activist ravindra barhat), बडतर्फ पोलीस शिपाई शैलेश जगताप (dismissed police shailesh jagtap), संजय भोकरे (रा. सांगली) (sanjay bhokare sangli), पत्रकार देवेंद्र जैन (devendra jain journalist), परवेझ जमादार (Pervez Jemadar), जयेश जगताप (Jayesh Jagtap), प्रशांत फाले (Prashant Fale), विशाल तोत्रे (Vishal Totre), प्रमचंद रतनचंद बाफना (Pramchand Ratanchand Bafna), प्रशांत बाफना (Prashant Bafna), हरिष किरण बाफना (Harish Kiran Bafna), राज किरण बाफना (Raj Kiran Bafna), विनय मुंदडा (Vinay Mundada) , प्रशांत जोशी (Prashant Purushottam Joshi) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर खंडणी (Ransom), फसवणूक (Cheating), अपहरण करणे (Kidnapping), संगणमत करुन गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोपावरुन गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता..

आरोपी जोशीला कोथरुडमधून अटक (prashant joshi arrested from kothrud pune)

पुणे गुन्हे शाखा युनिट 1 चे (Pune Crime Branch Police) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी (दि.26) हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन जाधव (Police Sachin Jadhav) व दत्ता सोनवणे (Police Datta Sonawane) यांना गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी प्रशांत जोशी (Prashant Joshi) हा नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोथरुड (Kothrud) येथील गांधी भवन स्मारक येथे सापळा रचला. संशयित आरोपी प्रशांत पुरुषोत्तम जोशी (वय-46 रा. प्लॅट नं 12 अे 1 कृष्णलिला टेरेस, लेन नं.4, महात्मा सोसायटी जवळ, गांधी भवन मागे, कोथरुड) (Prashant Purushottam Joshi) हा नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला पुढील कारवाईसाठी चतु:शृंगी पोलिसांच्या (Chatushrungi police station) ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश रघुनाथ फाले (वय-41 रा. सांगवी) (Prakash Raghunath Phale) याला यापूर्वीच अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर विशाल गजानन तोत्रे (Vishal Gajanan Totre) याचा मार्च महिन्यात मृत्यू झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

पर्वती येथील जमीन निलमणी देसाई (Nilmani Desai) यांच्या वडिलांनी जावई धैर्यशील देसाई (dhairyashil desai) यांच्या नावावर केली होती.
त्यातील काही जागा विकसित केल्यानंतर धैर्यशिल (dhairyashil desai) यांच्याकडे 4 हजार 913 स्क्वेअर मीटर जागा शिल्लक राहिली होती.
धैर्यशिल देसाई (dhairyashil desai) यांच्या नावावरील उरलेली जागा तुमच्या नावावर करुन देतो असे
प्रशांत जोशी (Prashant Joshi) याने निलमणी यांना सांगितले होते.
याशिवाय प्रशांत जोशी (Prashant Joshi) याने त्यांच्याकडे शैलेश जगताप (Shailesh Jagtap),
जयेश जगताप (Jayesh Jagtap) जमीन विकत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
संबंधित जमिनीवर तुमच्या पतीच्या वारसांची नावे माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (rti activist ravindra barhat) लावून देणार असल्याचे निलमणी देसाई (Nilmani Desai) यांना सांगितले.

5 कोटींना जमिनीचा व्यवहार
शैलेश जगताप (Shailesh Jagtap) याने नीलमणीला ऋषिकेश बारटक्के (Rishikesh Bartakke) यांना जागा विका असे सांगितल्यावर त्यांच्याबरोबर 5 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला.
बारटक्के याने निलमणी देसाई (Nilmani Desai) व त्यांच्या मुलीच्या नावावर प्रत्येकी 5 लाख रुपये जमा केले.
त्यानंतर शैलेश जगताप (Shailesh Jagtap) व इतरांनी ऋषिकेश बारटक्के (Rishikesh Bartakke) यांना धमकावून 20 लाख रुपये घेतले.
दरम्यान जमिनीची मोजणी होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन आरोपींनी पैशांची मागणी केली.
तसेच या जमिनीच्या व्यवहारात तडजोडीसाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली.
याशिवाय वेळोवेळी धमक्या देऊन फिर्यादी व त्यांच्या सहकारी यांची प्रेस कॉन्फरन्स, प्रसार व इतर माध्यमातून बदनामी केली.
तसेच घरी हस्तक पाठवून धमक्या देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

ही कारवाई गुन्हे शाखा पुणे शहर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Ashok Morale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Crime Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 सुरेंन्द्र देशमुख (Assistant Commissioner of Police Surendra Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Police Inspector Bharat Jadhav), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (Police Sub Inspector Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (Police Sub Inspector Sanil Kulkarni), पोलीस अंमलदार विजेसिंग वसावे, अशोक माने, सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अय्याज दडडीकर, इम्रान शेख यांच्या पथकाने केली.

Web Titel :- Pune Police News | RTI activist Ravindra Barhate’s accomplice Prashant Joshi arrested pune crime branch picked him up from the Kothrud area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर