Pune Police News | माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेले पुणे पोलिस दलातील स्वप्नील गरड सध्या सुस्थितीत; प्रकृतीत सुधारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे शहर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत Economic Offences Wing Pune (EoW Pune) कार्यरत असणारे आणि माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेले स्वप्नील गरड (Swapnil Garad) हे सध्या सुस्थितीत असल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिली आहे. मोहिमेवर असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना रूग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले होते. आता मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्या मित्रांनी कळविले आहे. (Pune Police News)

 

स्वप्नील गरड हे काही दिवसांपुर्वी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजले होते. आता मात्र, त्यांची प्रकृती सुधारत असून ते सध्या सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केले आहेत. (Pune Police News) दरम्यान, स्वप्नील गरड यांनी मागील वर्षी जगातील सार्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम (Mount Ama Dablam in Nepal) हे शिखर सरक केले आहे. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले.

 

Web Title :  Pune Police News | Swapnil Gard of the Pune Police Force went on a
Mount Everest mission, currently in good condition; Improvement in health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा

Maharashtra Politics News | ‘गौतम अदानी पवारांच्या घरी रहायला गेले तरी…’ काँग्रेसची खोचक टीका