Pune Police News | ‘कोरोना’ संकटकाळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार (ALL PHOTOS)

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Police | ‘कोरोना’ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी (Police) जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (guardian minister and deputy chief minister ajit pawar) यांनी काढले. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (guardian minister and deputy chief minister ajit pawar) यांच्या हस्ते पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या (pune rural police headquarter) आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत (police welfare support programme) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने (Bharat Petroleum Corporation Limited) उभारण्यात आलेल्या बाणेर रोड (baner road) व पाषाण रोड (pashan road) येथील दोन पेट्रोल पंपाचे (Petrol Pump) उद्घाटन झाले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (home minister dilip walse patil), पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (pune collector dr rajesh deshmukh), पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (police superintendent dr. abhinav deshmukh), अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील (additional superintendent of police vivek patil), अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (additional superintendent of police milind mohite) , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक पी.एस. रवी (Bharat Petroleum Corporation Limited Executive Director P.S. Ravi) यांच्या सह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था (law and order) राखण्यासाठी पोलीस दल नेहमीच तत्पर असते. कोरोनाचे संकट परतवण्यासाठी पोलीस विभाग (Police Department), महसूल विभाग (Revenue Department), आरोग्य विभाग (Department of Health) यांच्यासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन व्हावे या करीता प्रयत्न करीत असतात. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास दंड वसुलीची गरज पडणार नाही.

पोलीस दलातील (Police Department) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी (Police officers and staff) आपली कार्यक्षमता अधिक वाढविण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. पोलीस दलावर नागरिकांचा प्रचंड विश्वास असून लाचखोरी, भ्रष्टाचार व खंडणी अशा अप्रवृत्तीला बळी पडता कामा नये. पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांनी यावेळी केल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पर्यावरणाचा विचार करता, काळाची गरज लक्षात घेता स्वतंत्र सीएनजी पेट्रोल पंप व चार्जिंग स्टेशन (Independent CNG petrol pump and charging station) उभारणीवर भर दिला पाहिजे.
राज्यशासनाने इलेक्ट्रीकल वाहनाच्या वापराकरीता अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
वीजेची गरज लक्षात घेता,
सोलारची व्यवस्था करुन विजेवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रदुषणचा विचार करता पेट्रोलपंपावर पीयूसी सेंटरची (PUC Center) व्यवस्था करावी,
असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (home minister dilip walse patil) म्हणाले,
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी (Police Officers and Staff) यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात जवळपास 700 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
पोलीस दलातील शिपाई (police constable) पोलीस आजच्यामितीला सहायक पोलीस उपनिरीक्षक (assistant police sub inspector) या पदावर सेवानिवृत्त होतो.
यापुढे पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदावर सेवानिवृत्त झाला पाहिजे,
असा प्रस्ताव गृह विभागाच्यावतीने तयार करण्यात येत आहे.
यामुळे शासनाच्या आर्थिक तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नसून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी सेवेत वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी देण्याच्या प्रयत्न आहे.

गृह विभाग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
नागरिकांचे मित्र म्हणून भूमिका बजावत असताना त्याकडून प्रेम व आस्था मिळविण्यासाठी प्रयत्न करा,
असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (home minister dilip walse patil) म्हणाले.

पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव (Honors to the Director General of Police Medal winning officers and staff)

उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy chief minister ajit pawar) यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मान पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला (Honors to the Director General of Police Medal winning officers and staff).
त्यामध्ये पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, अशोक धुमाळ,
सहायक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस हवालदार संतोष बगाड व पोलीस शिपाई सुलतान डांगे यांचा समावेश आहे.

कर्तव्यावर कार्यरत असतांना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
यांच्या हस्ते कर्तव्यावर कार्यरत असतांना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
त्यामध्ये पोलीस शिपाई रोहित वायकर, धनंजय भोसले, धनंजय आगवणे, ओंकार भोसले, राहुल कदम, तुषार दराडे व तुषार भोसले यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (police superintendent dr. abhinav deshmukh) यांनी केले.
यावेळी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (Bharat Petroleum Corporation Limited) कंपनी कॉन्ट्रॅक्टर डॉ. विजय सावरगावकर (Contractor Dr. Vijay Savargaonkar), सचिन घोडके (Sachin Ghodke) देखील उपस्थित होते.

Web Titel :- Pune Police News | The performance of the police during the ‘Corona’ crisis is remarkable – Deputy Chief Minister Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू