Pune Police News | ‘त्या’ सर्व पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पोलिस आयुक्तांनी आवश्यक पावले उचलावीत ! पोलिसांच्या घरांचा, वसाहतींचा प्रश्न सोडविणार – DG Rajnish Seth
उद्योजकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस सदैव प्रयत्नशील, सायबर पोलिस स्टशेन अन् सीसीटीव्ही कॅमेर्यांबाबत डीजी म्हणाले...

पुणे (नितीन पाटील) – Pune Police News | शहरात वाहतूक थांबे (ट्रॅफिक सिग्नल) असलेल्या ठिकाणी साधारण पोलिस अंमलदारांची गरज भासत नाही. मात्र, दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमन (Pune Traffic Police) करणार्या सर्व पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पोलिस आयुक्तांनी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत. शहरातील पोलिस वसाहतींची अवस्था बिटक झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने त्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण महामंडळामार्फत पोलिसांसाठी नव्याने वसाहती निर्माण करण्यात येतील. प्रामुख्याने नव्याने अस्तित्वात येणार्या पोलिस स्टेशनच्या आवारातच पोलिसांना घरे निर्माण करून देण्यात येतील असे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ (IPS Rajnish Seth) यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी सायंकाळी पुणे पोलिस आयुक्तालयात पत्रकारांशी संवाद साधला. (Pune Police News)
पुण्यासह राज्यात नव नवीन उद्योग धंदे आल्यास राज्याची प्रगती होणार आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासह उद्योजकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून सर्वच बाजूने प्रयत्न करण्यात येत असल्याचे डीजी रजनीश सेठ यांनी सांगितले. या वेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यावेळी उपस्थित होते. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील उद्योजकांना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी त्याबाबत पोलिसांकडे तक्रार द्यावी. ज्यामुळे उद्योजकांना नाहक त्रास देणार्या गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांवर प्रतिबंध करणे शक्य होईल. याबाबत डीजी रजनीश सेठ सविस्तरपणे बोलले. (Pune Police News)
पुणे शहरातील वाहतूक (Pune Traffic Jam) व्यवस्था सुरळीत होण्यासह क्राईम (Pune Crime News)
रोखण्यासाठी शहरातील सीसीटीव्हींची (CCTV In Pune) संख्या वाढविण्यात येणार आहे.
यापुर्वी शहरात 1 हजार 400 सीसीटीव्ही होते आता नव्याने एक हजार ठिकाणी 2 हजार 800 सीसीटीव्ही
बसविण्यात येणार आहेत. ते सर्व कॅमेरे पोलिसांच्या कंट्रोल रूमशी जोडण्यात येणार आहेत.
यासंदर्भात त्यांनी व्यापारी संघटनांना आवाहन करण्यात येईल असे सांगितले.
अलिकडील काळामध्ये आर्थिक व सायबर गुन्हेगारीमध्ये (EoW Pune) कमालीची वाढ होत आहे.
त्यापार्श्वभुमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत.
त्यासाठी अत्याधुनिक तंऋज्ञान पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, युवक अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत.
त्यावर पुणे पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत असून ड्रग माफियांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात येत आहे
असे त्यांनी सांगितले. (DG Rajnish Seth Visit Pune CP Office)
Web Title : Pune Police News | The police commissioner should take necessary steps to take care of the health of ‘those’ policemen! Will solve the issue of police houses, colonies – DG Rajnish Seth
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा