Pune Police News | दुर्दैवी ! सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच पुणे पोलीस दलातील हवालदाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या पोलीस हवालदाराचा सेवानिवृत्त (Retired) झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू (Pune Police Havaldar Death Due to Heart Attack) झाला. प्रकाश अनंता यादव (Prakash Ananta Yadav) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्रकाश यादव यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Police News)

प्रकाश यादव हे बुधवारी (दि.31 मे) पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. पुणे पोलीस मुख्यालयात (Pune Police Shivaji Nagar Headquarter) बुधवारी झालेल्या कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील (IPS Sandeep Singh Gill) यांच्याहस्ते यादव यांचा सत्कार करण्यात आला होता. सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यादव यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Police News)

 

प्रकाश यादव हे पुणे पोलीस मुख्यालयात सी कंपनीत कार्यरत होते. ते पोलीस जीम ट्रेनर होते. प्रकाश यादव यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश यादव यांना पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यासंह पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

Advt.

Web Title :  Pune Police News : Unfortunately, the death of a Havaldar in the Pune police force on the second day of his retirement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा