Pune Police News | वारजे माळवाडी पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्यांना अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्याच्या (Pune Police News) वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) 2 वेगवेगळ्या कारवाया करत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना अटक केली आहे. अमोल अनिल मोरे (रा. वारजे) आणि अपुल्या उर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. pune police news | warje malwadi police arrest criminals who abscond in attempt to murder case

अमोल मोरे व त्यांच्या साथीदारांनी संकेत कंधारे याला पूर्ववैमण्यासातून वार करत
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अमोल मोरे हा पसार झाला होता.
त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. पण, तो मिळून येत नव्हता.
यादरम्यान उपनिरीक्षक अशोक येवले यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की,
मोरे हा सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात येणार आहे, अशी माहिती मिळाली.
त्यानुसार त्याला पकडण्यात आले आहे.

तर दुसऱ्या कारवाईत अपुल्या उर्फ वाघमारेला पकडले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी अपुल्या व त्याच्या मित्रांनी सोमनाथ धुमाळ (वय 20) व त्याचे मित्र गप्पा मारत बसले असताना हातात कोयते घेऊन येत त्यांच्यावर वार केले होते.
यात प्रशांत चौधरी हा तरुण जखमी झाला होता.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात आपल्या व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.
त्याचा शोध घेत असताना तो भुगाव डॅम (Bhugaon Dam) येथे असल्याचे समजले.
त्यानुसार त्याला पकडले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर खटके (Police Inspector shankar khatke) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक येवले, पथकातील कातुर्डे, शिरसाठ, शिरसागर, कामठे, कांबळे यांनी केली आहे.

Web Title : pune police news | warje malwadi police arrest criminals who abscond in attempt to murder case

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

SSC Result 2021 | दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !

Rajesh Tope | लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आणि RT-PCR सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात ‘एंट्री’

Sangli News । कोरोना झाल्याच्या भितीनं वाढदिवशीच सिव्हील इंजिनीअरनं केली आत्महत्या, प्रचंड खळबळ