गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलिसांचे ‘सेव प्लस हैश डोइंग मोर’ उपक्रम

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदीत देखील अत्यावश्यक वस्तू घेण्याच्या नावाखाली नागरिक बाहेर ओढत असून अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी पुणे पोलीस आणि लोकीव्ह इनिशिटीव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सेव प्लस हैश डोइंग मोर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात तुमच्या परिसरातील दुकानादारांकडून तुमचे साहित्य भरल्यानंतर कॉल करणार आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू आणि दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. तर, नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र अनेकजण भाजीपाला व मेडिकल आणि किरना दुकान साहित्य घेण्याच्या नावाखाली बाहेर पडत असून या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांना देखील ही गर्दी कशी कमी करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर आता पोलिसांनी तोडगा काढला आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम व अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या संकल्पनेतून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी सेव प्लस हैश डोइंग मोर उपक्रम सुरू केला आहे. लोकीव्ह इनिशिटीव्ह या संस्थेने व पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना यासाठी www.lociv.com ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांनी या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना त्यांच्या परिसरातील दोन किलोमीटरच्या अंतरात असणारे अत्यावश्यक दुकाने दिसतील. ग्रीन स्टार्सने दाखविलेल्या दुकानावर क्लिक केल्यानंतर तुम्ही वस्तू मागणी।करू शकता. दुकानदार तुमच्या वस्तू काढून त्याचे पॅकेट तयार करेल आणि तुम्हाला फोनकरून वस्तू झाल्याचे सांगेल. त्यांनतर तुम्ही त्या वस्तू घेऊन येण्यासाठी जायचे. त्यामुळे नागरीकाना थांबावे लागणार नाही. तसेच गर्दी देखील होणार नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like