Pune Police | आता पुण्यातही महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | राज्य शासनाने राज्यातील सर्व महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्युटी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) देखील महिला पोलिसांची ड्यूटी आठ तास करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी ही माहिती दिली.

याबाबत आयुक्त गुप्ता म्हणाले, महिला पोलिसांना शासकीय कर्तव्या सोबतच दैनंदिन पारिवारिक जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागते. या दोन्ही जबाबदाऱ्या यांचा ताळमेळ करताना महिला पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ उडते. या महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी सहजतेने पार पाडता यावी आणि त्यांनी गृहिणीचे उत्तम कर्तव्य देखील पार पाडावे यासाठी महिलांची ड्युटी कमी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना आणि विविध विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. सर्व प्रभारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून त्यांच्याकडील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त आठ तास ड्युटी लावली जाईल याकडे लक्ष देण्याचे आदेश देखील आयुक्त गुप्ता यांनी दिले आहेत.

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे बंदोबस्त गणेशोत्सव, ईद, मोहरम, नवरात्र, क्रिसमस, नववर्ष, महापुरुषांच्या जयंत्या, रामनवमी, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन इत्यादी वेळी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे त्या वेळी प्रभारी अधिकारी या नियमात अपवाद म्हणून बदल करू शकतात. आवश्यकतेनुसार ड्युटी चे हे तास वाढवता येऊ शकतात. यासोबतच अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि तात्काळ उद्भवणाऱ्या घटनांमध्ये महिला पोलिसांच्या कर्तव्याचा वेळ वाढविण्या संबंधीचा निर्णय संबंधित विभागाचे पोलिस उपायुक्त घेतील असे देखील (Pune Police) आयुक्त गुप्ता यांच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहराचे पोलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (jt cp ravindra shisve) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

राज्यातील सर्वात पहिल्यांदा आठ तास ड्युटी करण्याचा निर्णय पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतला होता.
ग्रामीण पोलिसांचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh)
यांच्या या मॉडेलच्या यशस्वीते मुळे सबंध राज्यात लागू करण्याचा आदेश काढण्यात आला. आता त्याची अंमलबजावणी पुण्यात देखील होणार आहे.

Web Titel :- Pune Police | Now even in Pune, women police are on duty for eight hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tata Group | जेफ बेजोस यांची अमेझॉन आणि अंबानींच्या जिओमार्टला टक्कर देणार टाटाचे हे सुपरअ‍ॅप, नवीन वर्षात होणार लाँच

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Army | काश्मीरमधून भारतीय लष्कर हटवले तर तिथे सुद्धा तालिबान येईल, ब्रिटिश खासदाराने जगाला दिला इशारा (व्हिडीओ)