Pune Police On Elrow and Unicorn House Pub | पुण्यातील ‘एलरो’ आणि ‘युनिकॉर्न हाऊस’वर पोलिसांची कारवाई, पहाटेपर्यंत सुरू होता धांगडधिंगा, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)पुणे : Pune Police On Elrow and Unicorn House Pub | ‘युनिकॉर्न हाऊस’ आणि ‘एलरो’ या कल्याणी नगरमधील दोन पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) कारवाई केली आहे. या दोन्ही पबकडून तब्बल २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये साऊंड सिस्टिम, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आदी साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी शहरातील पब, बार, रुफ टॉप हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना रात्री दीड पर्यंतची वेळ ठरवून दिली आहे. या दोन्ही ठिकाणी वेळेच्या या नियमांचे उल्लंघन सुरू होते. तसेच जोरजोराने साऊंड सिस्टिम वाजवण्यात येत होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की कल्याणी नगरमधील सेरेब्रह्म आयटी पार्क बी ३ या इमातीच्या ८ व्या मजल्यावर एलरो नावाचे रुफ टॉप हॉटेल व पब आहे. ८ एप्रिल रोजी रात्री दीड ते सकाळी पावणे सहा वाजेपर्यंत हा पब सुरू होता. हे निदर्शनास येताच पोलिसांनी पबवर छापा मारला. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ हा पब सुरू होता. तसेच मोठमोठ्याने साऊंड सिस्टिम वाजवण्यात येत होती.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास देऊन सार्वजनिक उपद्रव केला जात होता. या ठिकाणावरून १७ लाख रुपयांची साऊंड सिस्टिम, साऊंड बॉक्स, कन्सोल, लाईट कंट्रोलर यासोबतच ३ लाख ८७ हजार ८४१ रुपयांचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आदी साहित्य मिळून वीस लाख ८७ हजार ८४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस नाईक अमेय अनिल रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे Sandeep Harshvardhan Sahastrabuddh (रा. शिवाजीनगर), अमन इदा शेख Aman Ida Shaikh (वय ३०, रा. विकास नगर, लोहगाव), रश्मी संदेश कुमार Rashmi Sandesh Kumar (रा. औंध), सुमित चौधरी Sumit Chaudhary (रा. लोहगाव) यांच्यावर भादवि कलम १८८, २९१, ३४ व सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ७ (२) २०(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात कल्याणी नगर येथे सेरेब्रह्म आयटी पार्क या इमारतीच्या ८ व्या मजल्यावर हॉटेल युनिकॉन हाऊस
नावाचा आणखी एक पब हेच सर्व चालवत होते. येथे रात्री दीड ते पहाटे पावणे सहापर्यंत बेकायदेशीरपणे पब सुरू होता.
तसेच ठरलेल्या वेळेच्या नियमाचे उल्लंघन करून साऊंड सिस्टिम वाजवण्यात येत होती.

युनिकॉन हाऊस पबच्या छाप्यात पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपयांची साऊंड सिस्टिम,
४१ हजार १४९ रुपयांचे तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, इतर मुद्देमाल असा
एकूण ७ लाख ९१ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस शिपाई संदीप खंडू कोळगे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (रा. शिवाजीनगर),
प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय ३०, रा. सह्याद्री हॉस्पिटल जवळ, येरवडा), रश्मी संदेश कुमार (रा. औंध),
सुमित चौधरी (लोहगाव) यांच्या विरोधात आणखी गुन्हा दाखल केला आहे.

ही करवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), सुनील तांबे (ACP Sunil Tambe),
वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bharat Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Anikest Pote)
आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे (API Rajesh Malegave) आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित